शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

हजारो व्यक्ती अन् कुटुंबांचा आधारवडच कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:31 IST

रत्नागिरी : समाजसेवेची नुसती आवड असून चालत नाही, ती व्रत म्हणून अंगात भिनावी लागते. त्यासाठी कशाचीही तमा न ...

रत्नागिरी : समाजसेवेची नुसती आवड असून चालत नाही, ती व्रत म्हणून अंगात भिनावी लागते. त्यासाठी कशाचीही तमा न बाळगता अहोरात्र काम करण्याची तयारी लागते. देवरुखमधील मातृमंदिरचा आधारवड असलेल्या शांता नारकर याही याच मुशीतून तयार झालेल्या. म्हणूनच असंख्य व्यक्तींचे, कुटुंबांचे आयुष्य सुकर करण्याचे काम त्यांच्या हातून घडले. शुक्रवार ,दि. १६ रोजी हा आधारवड कोसळला.

हजारो मुली, महिलांना त्यांनी आत्मविश्वासाने जगण्याची ताकद दिली. इतकी क्षमता त्यांच्यामध्ये आली ती त्यांच्यावर झालेल्या संस्कारातून. मातृमंदिर रुग्णालयाची स्थापना करणाऱ्या इंदिराबाई तथा मावशी हळबे यांची मानसकन्या ही शांता नारकर यांची पहिली ओळख. मावशींच्या देखरेखीत त्यांचे शालेय शिक्षण झालेच, पण इथेच मुळात त्यांच्यावर संस्कार सुरू झाले. गोपुरी आश्रमचे आप्पा पटवर्धन, ना. ग. गोरे, मधू दंडवते अशा खऱ्याखुऱ्या ‘समाजसेवकां’चा मातृमंदिरमध्ये सततचा वावर होता. त्यांच्या समाजवादी विचारसरणीचा खूप मोठा पगडा शांता नारकर यांच्यावर झाला. त्यामुळेच साधी राहणी आणि उच्च कोटीतील काम हा त्यांचा आयुष्याच्या अखेरपर्यंतचा अविभाज्य भाग होता.

मातृमंदिरसाठी अत्यंत तळमळीने काम करणारे विजय तथा भाऊ नारकर त्यांचे सहचर झाले. या जोडीने मातृमंदिरच्या कामाला, मावशींच्या स्वप्नाला वेगळ्याच उंचीवर नेले. ग्रामीण भागातील महिलांना ताठ मानेने जगता यावे, यासाठी त्यांना आर्थिक स्थैर्य देणे गरजेचे आहे, हे ओळखून शांता नारकर यांनी आतापर्यंत सुमारे ५८७ महिला बचत गटांची निर्मिती केली आहे. या बचत गटांचे फेडरेशन करून त्यांच्या चळवळीला पुढे नेण्याचे कार्य शांता नारकर यांनी केले आहे. बचत गटाच्या माध्यमातून अनेक गावांमध्ये महिलांना स्वयंरोजगाराचे साधन मिळाले आहे. शेती विकासाबरोबरच गावांमध्ये बालवाड्या निर्माण केल्या आहेत. अनाथ मुलींसाठी सुरू केलेल्या गोकुळ या बालगृहात आज ५० मुली शिकत आहेत. पाणीटंचाईचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी पाणी योजनांसाठी अनेक ठिकाणच्या ग्रामस्थांना प्रोत्साहित केले. त्यामुळे अनेक ठिकाणची समस्या सुटली. कामाचा हा उत्साह त्यांनी अखेरपर्यंत टिकवून ठेवला.