शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पक्षासाठी काम करेल त्याचाच विचार

By admin | Updated: March 16, 2015 00:14 IST

विनय नातू : जिल्हा बँक निवडणुकीत भाजप महत्त्वाच्या भूमिकेत

देवरूख : भारतीय जनता पार्टीसाठी जो वेळ देऊन काम करेल त्यालाच पदे देताना विचार केला जाईल, यासाठी कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना वाठवण्यासाठी स्वत:ला झोकून द्यावे, असे आवाहन माजी आमदार, कोकण प्रभारी डॉ. विनय नातु यांनी देवरुख येथील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना केले. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपाने अद्याप कोणताच निर्णय घेतला नसून, यासाठी दक्ष राहण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या.देवरुख येथील नक्षत्र सभागृहात संगमेश्वर तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला भाजपाचे जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर, देवरुखच्या नगराध्यक्षा राजवाडे, जिल्हा परिषद सदस्या मिनाक्षी दीपक जाधव, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मंदार भिडे, नगरसेवक आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.तालुका कार्यकारिणी सचिव रूपेश भागवत यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सुरुवातीला तालुक्यात सुरु असलेल्या भाजप सदस्य नोंदणीचा आढावा घेण्यात आला. ३१ मार्च ही सदस्य नोंदणीची अखेरची तारीख असल्याने तालुक्यात सदस्य नोंदणी मोहीम प्रभावीपणे राबवण्यात यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. केंद्र आणि राज्य शासन ज्या लोकोपयोगी योजना राबवत आहे, तसेच लोकांच्या कल्याण्याचे जे निर्णय घेत आहे ते तळागाळात पोहचवण्यात यावेत, अशा सूचना कार्यकर्त्यांना करण्यात आल्या. तालुक्यातील विभागवार विकास कामांचा आढावा तयार मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्री यांच्यापर्यंत सादर करण्याचे यावेळी ठरविण्यात आले. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी महत्वाच्या भूमिकेत असेल, यासाठी कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, असे आवानही करण्यात आले. जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी झालेल्या चर्चेत माजी तालुका अध्यक्ष मुकुंदराव जोशी, सुरेश गांधी, दीपक जाधव, कुंदन कुलकर्णी, नगरसेवक भुरवणे, पंचायत समिती माजी सदस्य जाकीर शेकासन, अमित केतकर आदींनी भाग घेतला. (प्रतिनिधी)