शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

मखरासाठी आणलेल्या थर्माकोलला आग

By admin | Updated: July 15, 2017 15:01 IST

आगीत तीन वर्षांचा मुलगा बालंबाल बचावला

आॅनलाईन लोकमत

देवरूख (जि. रत्नागिरी), दि. १५ : मखर करण्यासाठी आणलेल्या थर्माकोलला आग लागून घराचे छप्पर, मंडप व दुचाकीसह अनेक वस्तू जळून १ लाख ५९ हजार ३०० रूपयांचे नुकसान झाल्याची घटना गुरूवारी सकाळी घडली. या आगीत तीन वर्षांचा मुलगा बालंबाल बचावला आहे. कांजिवरा येथील बसाण्णा शिवपुत्र हळमणी यांच्या घरात ही आगीची घटना सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

हळमणी यांचे सुपुत्र शिवाजी, महादेव व लिंगाप्पा हे गणेशोत्सवासाठीची थर्माकोलची मखरे दरवर्षी बनवतात. मखरे बनवण्यासाठी ९० हजार रूपयांचा थर्माकोल आठ दिवसांपूर्वीच घराला लागून असलेल्या मंडपात आणून ठेवला होता. सकाळी ९.३०च्या सुमारास घराच्या मंडपात आगीचे तांडव सुरू झाले. या थर्माकोेलच्या ढिगाला आग लागून हळमणी यांचे घर पूर्णपणे काळ्या धुरात बुडाले होते. आग लागलेल्या मंडपाशेजारीच शिवाजी हळमणी यांचा तीन वर्षांचा नील हा मुलगा झोपलेला होता.

आगीने रौद्ररूप धारण करून नील झोपलेल्या खोलीच्या खिडकीनेही पेट घेतला होता. खिडकीच्या स्लायडिंग काचा जळून गेल्या. यावेळी नील हा मुलगा झोपलेला आहे, हे लक्षात येताच नागरिकांनी त्या धुरात धाव घेऊन नील याला झोपलेल्या अवस्थेत उचलून बाहेर आणले. आगीत मंडपाचे पत्रे तसेच त्याला लागून असलेल्या घराचे पत्रे जळून खाक झाले. तसेच ९० हजार रूपयांच्या थर्माकोलची रांगोळी झाली. याच मंडपात लिंगाप्पा हळमणी यांची अ‍ॅक्टिव्हा दुचाकी ठेवण्यात आली होती. या गाडीचे वायरींग व इंजिनला जोडलेल्या कॉईल्स जळून खाक झाल्या. याच मंडपात दोन कपाटे ठेवण्यात आली होती. या कपाटात रंगांचे डबे, वायरिंग साहित्य होते. यात ड्रील मशीन, ग्रार्इंडर, मंडप सजावटीचे पडदे, ग्रीनेरी अशा प्रकारच्या वस्तूही जळून गेल्या.

साखरपा येथे बंद घर फोडून टीव्ही लांबवला

संगमेश्वर तालुक्यातील साखरपा पत्कीवाडीतील बंद घर फोडून चोरट्याने १५ हजार रुपये किमतीचा टीव्ही लांबवल्याची घटना उघडकीस आली. साखरपा पत्कीवाडीतील कृष्णा सखाराम बार्इंग हे आपले घर बंद करून कामानिमित्त मुंबईला गेले होते. ते बुधवारी सकाळी ९ वाजता घरी आले असता बंद असलेल्या घराच्या दरवाज्याचे कुलूप त्यांना फोडलेले दिसले. यावरून आपल्या घरात चोरीचा प्रकार झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. घरात प्रवेश केला असता १५ हजार रुपये किमतीचा सॅन्सुई कंपनीचा ३२ इंची एलईडी टीव्ही चोरून नेल्याचे निदर्शनास आले. त्यांनी साखरपा पोलीस ठाण्यात टीव्ही चोरीला गेल्याची फिर्याद दिली. यानुसार पोलिसांनी चोरट्याविरोधात ४५४, ४५७ व ३८० कलमाप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस. टी. उकार्डे करीत आहेत.

कुवारबाव येथे ट्रक चोरीस

कुवारबाव परिसरातील ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी मोकळ्या जागेत उभा करून ठेवलेला ९ लाख रुपये किमतीचा ट्रक चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञाताविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण अरविंद साळवी (४३, सुयोग सोसायटी, कुवारबाव) यांनी आपल्या ताब्यातील ट्रक दि. ११ जुलै रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास कुवारबाव ग्रामपंचायतीच्या बाजूला उभा करून ठेवला होता. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ट्रक घेण्यासाठी ग्रामपंचायतीजवळ आले. त्यावेळी त्यांना ट्रक जागेवर दिसून आला नाही.