शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

धरणांना पावसाची अद्यापही प्रतीक्षाच

By admin | Updated: June 22, 2016 00:15 IST

पाणी जमिनीतच मुरले : पाणीसाठ्यात किंचित वाढ

प्रकाश वराडकर -- रत्नागिरी जिल्ह्यातील पाटबंधारेच्या मध्यम व लघु धरणांना अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे. मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने या धरणांमधील पाणीसाठ्यात किंचित वाढ झाली आहे. मान्सूनपूर्व पावसाचे पाणी जमिनीतच मुरले असून, धरणात झिरपलेले नाही. त्यामुळे धरणांमधील पाणीपातळी वाढलेली नाही. मात्र, मान्सूनपूर्व पावसाने टंचाईचा प्रश्न काही प्रमाणात सुटला आहे. जिल्ह्यात पाटबंधारेच्या मध्यम व लघु अशा ६३ धरणांमध्ये २१ जून २०१६ रोजी १९२.७७ दशलक्ष घनमीटर अर्थात ४३.३८ टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस झाला. मात्र, धरण क्षेत्रात हा पाऊस न झाल्याने पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. यावर्षी मान्सूनने कोकणला चकवा दिला आहे. कोकणमार्गे मान्सून न येता अन्य मार्गाने विदर्भात पोहोचला आहे. मंगळवारी जिल्ह्याच्या काही भागात पाऊस झाला. हा पाऊस म्हणजे मान्सूनची हजेरी असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, दमदार पावसाची जिल्हावासीयांना अजूनही प्रतीक्षाच आहे. जिल्ह्यात ६३ धरण प्रकल्पांपैकी २८ प्रकल्पांमध्ये २० टक्केपेक्षाही कमी पाणीसाठा आहे. त्यामध्ये चिंचाळी, तुळशी, सोंडेघर, सुकोंडी, आवाशी, टांगर, पंचनदी, नातूवाडी मध्यम धरण प्रकल्प, तिवरे, फणसवाडी, असुर्डे, राजेवाडी, साखरपा, निवे, गवाणे, बेणी, पन्हाळे, बेर्डेवाडी, हर्दखळे, कशेळी, तळवडे, दिवाळवाडी, परुळे, कोंड्ये, काकेवाडी, गोपाळवाडी, जुवाठी या धरणांचा समावेश आहे. १२ धरणांमध्ये पाण्याची स्थिती चांगली असून, त्यामध्ये ५१ टक्के ते ९४ टक्के या दरम्यान पाणीसाठा आहे. या धरणांमध्ये मुचकुंदी, अर्जुना, चिंचवाडी, पणदेरी, शेलारवाडी, मालघर, अडरे, खोपड, आंबतखोल, तेलेवाडी, गडनदी, रांगव या धरणांचा समावेश आहे. लांज्यातील केळंबा व राजापूर तालुक्यातील ओझर ही धरणे कोरडी आहेत. यातील काही धरण प्रकल्प अजूनही पूर्णत्वास न गेल्याने त्यामध्ये पाणीसाठा नाही. पाटबंधारे धरणांच्या क्षेत्रात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी अत्यल्प आहे. १ जून २०१६पासून आत्तापर्यंत या ६३ पैकी ६२ धरणांच्या क्षेत्रात एकूण १०८७१ मिलिमीटर पर्जन्यवृष्टी झाली आहे. आंबतखोल धरण क्षेत्रात अद्याप पावसाने हजेरी लावलेली नाही. धरण क्षेत्रातील पर्जन्यमान मोजण्यासाठी पर्जन्यमापक बसविण्यात आले आहेत. त्यामुळे दररोज पडणाऱ्या पावसाची माहिती ही त्या-त्या दिवशीच उपलब्ध होणार आहे.पाणीकपात मात्र बंद : पाच प्रकल्पांमध्ये पाण्याचा ओघ सुरुविहिरी, नळांना पाणी...धरणांमध्ये पाणीसाठा मोठ्या प्रमाणात झाला नसला तरी पावसाचे पाणी जमिनीत मुरले आहे. त्यामुळे आटलेल्या विहिरींना पाणी आले आहे. पाटबंधारे धरणांच्या बाजूला उभारलेल्या जॅकवेलवर अवलंबून असलेल्या जिल्ह्यातील ९२ नळपाणी योजनांच्या पाण्यात याआधी कपात करण्यात आली होती. मात्र, आता नळ योजनांना पूर्ववत पाणीपुरवठा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. हरचिरी धरण पातळीत वाढरत्नागिरी तालुक्यातील पाच ग्रामपंचायती व नगर परिषदेच्या नळ योजनांना पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडिसीच्या हरचिरीसह पाच कोल्हापूर धरण प्रकल्पांमध्ये पाण्याचा ओघ सुरू झाला आहे. चार धरणांमधील पाणी मे अखेरीस संपले होते. केवळ हरचिरी धरणातील पाणी योजनांना पुरवठा केला जात होता. मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीनंतर पाण्यात केलेली कपात रद्द करण्यात आली आहे. कुवारबाव, नाचणे, मिरजोळे, कर्ला, आंबेशेत, शिरगाव या गावांना एमआयडिसीकडून पाणीपुरवठा केला जातो. तसेच रत्नागिरी नगर परिषदेला अंशत: पाणीपुरवठा केला जातो.