शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत सैन्य भरतीची अ‍ॅकॅडमी व्हावी --- मेजर विजयकुमार पिंगळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 12:03 IST

पश्चिम महाराष्ट्रासारख्या प्रशिक्षण अ‍ॅकॅडमी याठिकाणी निर्माण झाल्यास कोकणातील उमेदवारांची संख्या नक्की वाढेल, असा विश्वास गुजरात, गोवा आणि महाराष्ट्राचे प्रमुख मेजर जनरल विजयकुमार पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

ठळक मुद्दे रत्नागिरीइतके चांगले मैदान, व्यवस्था कोठे नसल्याची माहिती - मेजर विजयकुमार पिंगळे यांचे मतउमेदवारांची १९ जानेवारीला कोल्हापूर येथे लेखी परीक्षा होणार आहे.

रत्नागिरी : सैन्य भरतीतील कोकणचे योगदान हळुहळू कमी होत आहे, त्याचे कारण आम्हालाही शोधता आलेले नाही. पण इथले प्रशासन, सैनिक कल्याण बोर्ड यांनी इथल्या मुलांना प्रोत्साहन द्यावे, त्यांच्यात सैन्य भरतीतील फायद्याबाबतची जाणीव निर्माण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत.

पश्चिम महाराष्ट्रासारख्या प्रशिक्षण अ‍ॅकॅडमी याठिकाणी निर्माण झाल्यास कोकणातील उमेदवारांची संख्या नक्की वाढेल, असा विश्वास गुजरात, गोवा आणि महाराष्ट्राचे प्रमुख मेजर जनरल विजयकुमार पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.रत्नागिरीत १७ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या सैन्य भरतीचा समारोप बुधवारी करण्यात आला. यासाठी मेजर जनरल पिंगळे उपस्थित होते. दररोज ४ हजार ते ४ हजार ९०० उमेदवार भरतीसाठी येत होते. मात्र, जिल्हा प्रशासनाने त्यांची सुरक्षितता, राहण्याची व्यवस्था केली होती. या मुलांसाठी १२० मोबाईल स्वच्छतागृहे उपलब्ध करून दिली होती. रत्नागिरीइतकी चांगली व्यवस्था तसेच मैदान कुठल्याही अन्य जिल्ह्यात उपलब्ध झाले नसल्याचे पिंगळे यांनी सांगितले. सामाजिक संस्थांचेही त्यांनी आभार मानल.लेखी परीक्षासैन्य भरतीसाठी ४७ हजारच्या आसपास उमेदवार उपस्थित होते. त्यांच्यापैकी ४ हजार ४४५ उमेदवारांची निवड झाली. या उमेदवारांची १९ जानेवारीला कोल्हापूर येथे लेखी परीक्षा होणार आहे. त्यात उत्तीर्ण होणाऱ्या उमदेवारांना प्रशिक्षणासाठी पाठवले जाणार आहे.५०० मोदक भेटया भरतीसाठी उपस्थित असलेले अधिकारी आणि अन्य जवान यांच्यासाठी रत्नागिरीतील सडामिऱ्या येथील निवृत्त शिक्षिका सुलक्षणा सुभाष सावंत, कविता संदीप होळकर, कुसुम प्रदीप कांबळे यांनी ५०० मोदक तयार करून आणले होते. या आगळ्या वेगळ्या भेटीने अधिकारीही भारावून गेले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी