शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

एक कोटीचा आराखडा अन् दमडीचीही नाही तरतूद!

By admin | Updated: May 31, 2016 00:35 IST

अर्जुना नदी खोरे : समृध्द अभियानाला निधीची प्रतीक्षा

राजापूर : अर्जुना नदी खोरे समृद्ध अभियानांतर्गत नदीकाठच्या २८ गावांच्या विकासासाठी तयार केलेला १ कोटी रुपयांच्या आराखड्यात निधीची तरतूदच न झाल्याने एका चांगल्या अभिनयाला खीळ बसली आहे.तालुक्याची जीवनदायी ठरलेली अर्जुना नदी पूर्व परिसरात अणुस्कुरा घाटाच्या कुशीत उगम पावते व नंतर ती पश्चिमेला अरबी समुद्रात जावून मिळते. जवळपास ७० ते ७५ कि. मी. तिचा प्रवास असून, तिच्या उभय काठावर सुमारे २८ गावे येतात. त्यामध्ये करक, पांगरीखुर्द, कारवली, पाटकरवाडी, पाचल बाजारवाडी, पेठवाडी, रायपाटण, टक्केवारी, बागवेवाडी, गांगणवाडी, येळवण, कोळवणखडी, मुसलमानवाडी, ठिकाणकोंड, उन्हाळे, दोनिवडे, शीळ, कोंड्येतर्फे राजापूर, परटवली, गोठणे दोनिवडे, हातवकरवाडी, चिखलगाव, पाजवेवाडी, मळेवाडी, आंगले, फुफेरे अशा गावांचा समावेश आहे.अर्जुनाच्या पुनरुज्जीवनातून तिच्या काठालगतच्या या सर्व गावांचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला होता व त्यासाठी सुमारे १ कोटी रुपयांच्या खर्चाचा आराखडाही तयार करण्यात आला. तथापि, शासनाकडून या आराखड्यासाठी अद्यापही आवश्यक निधीची तरतूदच करण्यात आलेली नाही. यापूर्वी जाहीर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात त्याबाबत तरतुदीची अपेक्षा होती. पण ती पूर्ण झाली नाही. (प्रतिनिधी)शासनाच्या वाटाण्याच्या अक्षता...अर्जुना नदीच्या पुनरुज्जीवनासाठी मोठा गाजावाजा करण्यात आला. त्यासाठी जागतिक कीर्तीचे जलपुरुष व मेगॅसेसे पुरस्कार विजेते डॉ. राजेंद्रसिंह यांनाही तालुक्यात आणण्यात आले होते. त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा करुन देण्यात आला. पण एवढे होऊनही शासन मात्र उदासीनच राहिले आहे. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खेडमध्ये नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी निधी अपूर्ण पडू देणार नाही, असे आश्वासन दिले होते. मात्र, त्यालाच शासनाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.