शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

...तर त्यांना पक्षातून हाकला : भास्कर जाधव

By admin | Updated: July 25, 2016 00:48 IST

राष्ट्रवादीची सभा : रमेश कदम यांना लगावला टोला

सावर्डे : ज्या कुणाला वाटत असेल की आपण नाही तर पक्ष वाढणार नाही, अशांना पक्षातून हाकलून द्या, अशा शब्दांत आमदार भास्कर जाधव यांनी माजी आमदार रमेश कदम यांना टोला लगावला. जाधव-कदम यांच्या एकाच व्यासपीठावर येण्यामुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यकारिणीची व आजी-माजी लोकप्रतिनिधींची सभा रविवारी सावर्डे वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात झाली, त्यावेळी ते बोलत होते. या सभेत सावर्डे येथे नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली. मागील महिन्यात झालेल्या सभेनंतर काही काळ शमलेले जाधव आणि कदम यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांचे वादळ पुन्हा जोरदार घोंगावू लागले होते. त्यानंतर प्रथमच या सभेत दोघेही आमने-सामने आले. त्यामुळे या सभेत काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. जाधव म्हणाले, निवडणुकांमध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी आपला पक्ष आणि निवडून आल्यावर आमचे आम्ही, आमचा पक्षातील वरिष्ठांशी काही संबंध नाही, अशी भूमिका घेतली जाते. हे चुकीचे आहे. मला निवडणुकीत संधी मिळाली नाही तरी चालेल; पण माझा पक्ष निवडून आला पाहिजे, असा सल्ला जाधव यांनी दिला. यावेळी रमेश कदम म्हणाले, राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाल्यापासून आम्ही पक्षात आहोत. आम्ही अनेक वर्षे पक्षाचे प्रामाणिक काम केले, पक्ष वाढविला. आम्ही पक्षाचे काम करायचे आणि घोषणा ‘यांनी’ करायच्या. याला आम्ही काय समजायचं? आगामी निवडणुकीसाठी त्या-त्या परिसरातील त्या-त्या कार्यकर्त्याकडे उमेदवार निवडीचा हक्क द्या. त्यामुळे प्रत्येक विभागातील कार्यकर्त्यांना आपल्या आवडीचा उमेदवार निवडता येऊ शकतो. कोणी तरी येणार आणि आदेश देणार, तर तेथील कार्यकर्ते नाराज होतात, अशा शब्दांत त्यांनी जाधव यांना प्रत्युत्तर दिले. यावेळी पक्षाचे प्रभारी आमदार भास्कर जाधव, जिल्हाध्यक्ष शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम, आमदार संजय कदम, माजी राज्यमंत्री रवींद्र माने, राष्ट्रवादी युवकचे अजित यशवंतराव, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे, मुंबई प्रदेश उपाध्यक्ष केशव भोसले, शौकत मुकादम, आदी उपस्थित होते. (वार्ताहर) लक्षवेधी ४दोन्ही नेते रमेश कदम आणि भास्कर जाधव एकत्रित सभेला आले आहेत, हा माझ्या कारकिर्दीतील सुवर्णयोग आहे, असे यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम म्हणाले. ४राष्ट्रवादीचे नेते शौकत मुकादम यांनीही कदम आणि जाधव यांना एकत्र पाहून माझा ताप गेला, असे सांगितले. आगामी काळात युवकांना संधी द्या. जुन्या व्यक्तींना कितीवेळ संधी द्याल, अशी भूमिका मांडली. ४काँग्रेसने मला पाडल्यावर मी राष्ट्रवादीत आलो; मात्र येथेही तशीच गटबाजी? पक्षाशी निष्ठावंत रहा. उदय सामंत यांच्यासारखे नको, असे राष्ट्रवादीचे मुंबई उपाध्यक्ष केशव भोसले म्हणाले. ४सभेला सुरुवात झाल्यापासून ते सभा संपेपर्यंत भास्कर जाधव व रमेश कदम हे शेजारी बसले होते; पण शेवटपर्यंत ते एकमेकांशी अजिबात बोलले नाहीत. ४सभा चालू असताना आमदार संजय कदम आले. त्यांनी कदम, जाधव यांच्याकडे पाहिले आणि म्हणाले, अरे! आज दोघेही एकदम बाजू-बाजूला!