शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लोककला महोत्सवाच्या शोभायात्रेने अवघे चिपळूण दुमदुमले

By संदीप बांद्रे | Updated: February 5, 2023 12:46 IST

लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर व आप्पासाहेब जाधव अपरांत संशोधन केंद्र यांच्या वतीने चिपळूण येथे रविवारपासून चार दिवस आयोजित करण्यात आलेल्या लोककला महोत्सवाला रविवारी शोभायात्रेने सुरुवात झाली.

चिपळूण:

लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर व आप्पासाहेब जाधव अपरांत संशोधन केंद्र यांच्या वतीने चिपळूण येथे रविवारपासून चार दिवस आयोजित करण्यात आलेल्या लोककला महोत्सवाला रविवारी शोभायात्रेने सुरुवात झाली. ढोल-तश्याचा गजर, चालचित्रे व पारंपरिक वेशभूषेने नटलेल्या या शोभायात्रेने अवघे चिपळूण दुमदुमले. अनेकांनी उत्स्फूर्तपणे या शोभायात्रेत सहभाग घेतला.ज्येष्ठ साहित्यिक डॉ. तानाजीराव चोरगे, साहित्यिक प्रकाश देशपांडे, लोकमान्य टिळक वाचनालयाचे कार्याध्यक्ष धनंजय चितळे, लोककला महोत्सवाच्या नियोजन समितीचे प्रमुख प्रा. संतोष गोनबरे यांच्या उपस्थितीत नटराज पूजन करून शोभायात्रेला प्रारंभ झाला. चिपळूण शहरातील जुना कालभैरव देवस्थान ट्रस्टच्या सह्याद्री नगर या मैदानावर चार दिवस रंगणाऱ्या लोककला महोत्सवाला अभूतपूर्व उत्साहात सुरुवात झाली. यानिमित्त सकाळी ८.३० वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र या ठिकाणी नटराज पूजन झाले. यावेळी बालकलाकार रुद्र बांडागळे याने हा लोककला महोत्सव यशस्वीपणे पार पडावा, यासाठी खास कोकणी पद्धतीने गाऱ्हाणे घातले. यानंतर भव्य शोभा यात्रेला सुरुवात झाली. या शोभायात्रेत लोककलांचे दर्शन घडलं. १२ बलुतेदार व अन्य चलचित्रे या शोभायात्रेत आकर्षण ठरली  विद्यार्थ्यांसह विविध संस्था, नागरिक मोठ्या संख्येने शोभायात्रेत सहभागी झाले होते. पराग ओक यांनी वराह अवतार, कालभैरव ढोल ताशा पथक नवा व जुना कालभैरव, शिरगाव येथील वारकरी पथक, विविध झेंडे पथक, कुंभार्ली येथील सर्वात उंच जोडे हेही या शोभायात्रेचे वैशिष्ट्य ठरले. सह्याद्री स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी १२ बलुतेदार साकारले होते. कापसाळे येथील चित्ररथ, रेडा, महाकाल बुवांची जाखडी, सारीपट्टा मर्दानी खेळ, सहेली ग्रुपचा चित्ररथ, कोकणामध्ये खास असलेला खालुबाजा, चित्ररथ, झांज पथक, ढोल पथक यामुळे ही शोभायात्रा नागरिकांसाठी खास ठरली. शहरातील युनायटेड इंग्लिश स्कूल, सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूल पाग, परांजपे हायस्कूल, काळसेकर ज्युनिअर कॉलेज, ईकरा इंग्लिश मीडियम स्कूल, ख्रीस्त ज्योती कॉन्व्हेंट स्कूल, महाराष्ट्र हायस्कूल, आनंदराव पवार महाविद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल सती, डीबीजे कॉलेज, बांदल हायस्कूल, एसपीएम भोगाळे, पाग कन्या शाळा असे विद्यार्थ्यांचे संच यामध्ये सहभागी झाले होते. सर्वधर्मांना एकत्र आणणारे व सर्व लोककलांचे एकत्रित दर्शन घडवणारी अशी ही अनोखी शोभायात्रा ठरली. या शोभा यात्रेचे सूत्रसंचालन प्रकाश गांधी यांनी केले. दिलीप आंब्रे, कैसर देसाई, शिवाजी शिंदे, धीरज वाटेकर, तुकाराम पाटील, मनीष दामले, राठोड आदींनी या शोभायात्रेच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.