शहरं
Join us  
Trending Stories
1
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
2
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
3
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
4
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
5
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्याधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
6
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
7
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
8
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
9
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
10
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा
11
मुंबईविरुद्ध सामन्यात चेन्नईचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण
12
लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला, दरीत कोसळली गाडी; ६ जणांचा मृत्यू, वधू-वर गंभीर जखमी
13
Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टींचे दिसणे म्हणजे वर्षाखेरीपर्यंत संसाराला लागणार याची चिन्हं!
14
डॉ. वळसंगकर प्रकरणाला नवं वळण? आरोपी मनीषा हिला होती वळसंगकर कुटुंबातील वादाबाबत त्या गोष्टींची माहिती 
15
"कुठल्याही भाषेला विरोध नाही पण...", मनसेच्या हिंदी भाषा सक्ती विरोधानंतर मराठी अभिनेत्री स्पष्टच बोलली
16
ट्रम्प यांचं एक वक्तव्य गुंतवणूकदारांना भोवलं? अमेरिकन बाजार आपटला; डॉलरही घसरला
17
रेस्टॉरंट वेटर ते क्रिकेट अंपायर...! IPL मध्ये दिसणारा हा मराठमोळा पंच कोण आहे?
18
नाना पाटेकर घटस्फोट न घेताच पत्नीपासून राहतात वेगळे, यामागचं कारण आलं समोर
19
"मम्मी-पपा, मी आत्महत्या करतोय, यात तुमची काही चूक नाही"; 18 वर्षाच्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य
20
अमृतपाल समर्थकांनी अमित शहांसह अनेक नेत्यांवर हल्ला करण्याचा कट रचला; चॅटमधून मोठा खुलासा

वनविभागाने रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत दिले 'इतक्या' प्राण्यांना जीवदान

By संदीप बांद्रे | Updated: December 18, 2024 17:43 IST

संदीप बांद्रे चिपळूण : वन विभाग अथवा आपत्ती व्यवस्थापन विभाग असो, रात्री-अपरात्री मुका प्राणी संकटात सापडल्याचा फोन येतो, तेव्हा ...

संदीप बांद्रेचिपळूण : वन विभाग अथवा आपत्ती व्यवस्थापन विभाग असो, रात्री-अपरात्री मुका प्राणी संकटात सापडल्याचा फोन येतो, तेव्हा ही यंत्रणा वेळ न घालवता तितक्याच तत्परतेने घटनास्थळी पोहोचते आणि मुक्या प्राण्यांचा जीव वाचवते. गेल्या ३ वर्षात तब्बल ९१४ प्राण्यांचा जीव वाचवला गेला, तर ५६ प्राण्यांना जीव मुकावा लागला. आजही वन विभागाची यंत्रणा वन्यजीव प्राण्यांच्या संरक्षणासाठी सातत्याने प्रयत्न करताना बचाव कार्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापरही सुरू केला आहे.जंगलात पाणवठे कमी प्रमाणात असल्याने बऱ्याचदा हे प्राणी पायथ्यालगतच्या गावात येत असतात. त्यातून काही प्राणी भक्ष्य पकडताना विहिरीत किंवा खोल खड्ड्यात अडकण्याचे प्रकार नियमित घडतात. विशेषतः विहिरीत बिबट्या, डुक्कर, रानगवा, सांबर, माकड, मगर असे प्राणी अडकल्याच्या घटना अधूनमधून घडतच असतात.२०२१-२२ मध्ये २३५ मुक्या प्राण्यांना जीवदान देत नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले, तसेच २०२३ मध्ये ४०८ आणि २०२४ मध्ये २७१, असे एकूण ९१४ प्राण्यांचे जीव ३ वर्षांत वाचवण्यात आले. यामध्ये ७२ पाळीव प्राणी, साप व पक्ष्यांचे जीवही वाचवण्यात यश आले.

पक्ष्यांच्या अधिवासावर कुऱ्हाडीचे घाव

  • बऱ्याचदा सह्याद्रीच्या खोऱ्यातील काही गावांत जंगलतोडीचे प्रकार घडत असल्याने त्याठिकाणी असलेल्या पक्ष्यांच्या अधिवासाला धोका पोहोचत आहे.
  • वृक्षतोडीमध्ये मोठ्या झाडांची निवड केली जात असल्याने त्यावर असलेल्या घरट्यांचे नुकसान होत आहे. 

शहर डोंगर कपारीला भिडले

  • सध्या जिल्ह्यातील विविध शहरांत सपाटीचे क्षेत्र अपुरे पडू लागल्याने डोंगर उतारावरील जमिनी विकसित होऊ लागल्या आहेत.
  • डोंगर उतारावर असलेल्या झाडाझुडपांसह वृक्षांचीही तोड होत असल्याने त्याचा फटका प्राण्यांनाही बसत आहे. 

काट्याकुपाट्यात का अडकतात पक्षी

  • अनेक ठिकाणी पक्ष्यांपासून सुरक्षा मिळवण्यासाठी जाळ्यांची रचना केली जाते. मात्र, त्यामध्ये अडकून पक्षी जखमी झाल्याच्या घटना घडतात.
  • बऱ्याचदा शेताला तारेचे कुंपण करून त्यात विद्युत प्रवाह सोडला जातो. यामध्येही मुक्या प्राण्यांसह पक्ष्यांना जीव गमवावा लागतो. 

तारेसह प्लास्टिकचा गळ्याला फास

  • गेल्या काही वर्षांत प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असल्याने ते प्राण्यांच्या पायात अडकून जखमी होतात.
  • प्लास्टिकसोबतच तारा पक्ष्यांच्या पायात अडकून ते घायाळ झाल्याचे प्रकार घडतात. 

मध्यरात्री कॉल विहिरीत बिबट्या पडलाय

  • ग्रामीण भागातील अनेक विहिरी उघड्या असल्याने बिबट्या किंवा अन्य प्राणी भक्ष्य पकडण्याचा नादात विहिरीत पडतात.
  • अनेकदा रात्रीच्या वेळी या घटना घडत असल्याने मध्यरात्रीही वन विभागाला यंत्रणा घेऊन तेथे पोहोचावे लागते. 

तीन तास धडपड..जाळ्यात बिबट्याला पकडले

  • विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढताना मोठी कसरत करावी लागते.
  • काही वेळा तीन तासांची धडपड केल्यानंतर बिबट्या किंवा अन्य प्राणी विहिरी बाहेर काढले जातात.

मुक्या वन्यप्राण्यांचे जीव धोक्यात आल्यानंतर त्यांना तितक्याच तातडीने मदत द्यावी लागते. रात्री-अपरात्री केव्हाही फोन येतो. त्यामुळे संबंधित यंत्रणा नेहमी तयार ठेवली जाते. आता बचाव कार्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध झाल्याने त्याचा चांगला उपयोग होत आहे. अशी घटना घडल्यानंतर नागरिकांनी वन विभागाच्या हेल्पलाइन टोल फ्री क्रमांक १९२६ वर फोन करतात किंवा वैयक्तिक स्वरूपात संपर्क साधतात. - गिरिजा देसाई, विभागीय वन अधिकारी, चिपळूण

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीforest departmentवनविभाग