शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खेडमध्ये दिग्गजांची कसोटी

By admin | Updated: October 7, 2016 23:54 IST

वैभव खेडेकर निवडणूक लढविणार : खेड पालिकेचे नगराध्यक्षपद ओबीसी आरक्षित

खेड : खेड नगरपालिकेचे नगराध्यक्षपद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने खेडमध्ये मनसेचे विभागीय संघटक वैभव खेडेकर थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे पुढे येत आहे. त्याचवेळी शिवसेनेतून इच्छुक म्हणून बिपीन पाटणे, मिनार चिखले, मिलिंद इवलेकर, नागेश तोडकरी ही नावेही नगराध्यक्ष निवडणुकीसाठी चर्चेत असल्याने ही निवडणूक चुरशीची तसेच लक्षवेधक ठरणार आहे.खेड नगराध्यक्ष पदासाठी शहरात सर्वच पक्षात अनेक मातब्बर इच्छुक आहेत. खेड नगर परिषदेत सध्या १७ नगरसेवक आहेत. यातील १५ नगरसेवक निवडणुकीद्वारे निवडून आले आहेत, तर दोन नगरसेवक स्वीकृत आहेत. मनसेचे आठ, राष्ट्रवादीचा एक, तर शिवसेनेचे सहा नगरसेवक आहेत. उर्वरित दोन स्वीकृ त नगरसेवक मनसेचे आहेत. विद्यमान नगरसेवकांमध्ये माजी नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे माजी शहरप्रमुख बिपीन पाटणे यांचा समावेश आहे. पाटणे यांनी तीनवेळा नगरसेवकपद व एकवेळा नगराध्यक्ष पद सांभाळले आहे. त्यांचा नगरपरिषदेतील अनुभव लक्षात घेता शिवसेनेच्यावतीने त्यांना थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याकरिता संधी मिळू शकते. मात्र, शिवसेनेतर्फे विद्यमान नगरसेवक मिनार चिखले हेदेखील या पदासाठी इच्छुक आहेत. पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी आपल्या प्रभागात वैयक्तिक पातळीवर कामे केली आहेत. याबरोबरच शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक मिलिंद इवलेकर आणि माजी नगराध्यक्ष नागेश तोडकरी हेदेखील इच्छुक असल्याचे समोर आले आहे. सेनेतील या चार दिग्गजांच्या उमेदवारीच्या शक्यतेने शिवसेनेत काहीशी संघर्षमय स्थिती निर्माण होणार आहे. मात्र, शहरातील सर्वांनाच बरोबर घेऊन जाणाऱ्या उमेदवाराची चाचपणी करण्यात येणार असून, रामदास कदमांच्या उपस्थितीतच उमेदवाराची निवड केली जाणार आहे. त्यामुळे सध्यातरी शिवसेनेत माजी नगराध्यक्ष बिपीन पाटणे यांचेच नाव आघाडीवर आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वैभव खेडेकर यांनी या निवडणुकीची तयारी आधीपासूनच केली आहे. खेडेकर यांनी नगर परिषदेच्या माध्यमातून शहरातील अनेक आवश्यक असलेली विकासकामे मार्गी लावण्याकडे लक्ष पुरवले आहे. त्यामध्ये रस्ते, पाणी आणि पथदीप आदी प्राथमिक गरजांकडे त्यांनी स्वत: लक्ष देऊन ही कामे तातडीने करुन घेतली आहेत. नुकत्याच झालेल्या पूर परिस्थितीत त्यांनी शिवसेनेप्रमाणे मनसेतील आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन अनेकांना मदतीचा हात दिला आहे. नागरिकांचे लक्ष वेधून घेतले जाईल, अशी अनेक कामे त्यांनी गेल्या वर्षभरात केली असून, याचा लाभ त्यांना या निवडणुकीत मिळू शकतो. यामुळे शहरातील नागरिकही समाधानी आहेत. केलेल्या विकासकामांमुळे नगराध्यक्ष निवडणुकीत आपल्याला विजय मिळू शकतो, असा त्यांना विश्वास आहे. राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षात थेट नगराध्यक्षपद निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या नगण्य आहे. मात्र, तरीही ऐनवेळी उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशातच सेना - भाजप युती होण्याची शक्यता धुसर झाली असून, भाजपतर्फे स्वतंत्र निवडणूक लढविली जाण्याची शक्यता आहे. याकरिता माजी नगराध्यक्ष आ. बा. जोशी, अ‍ॅड. मिलिंद वाडकर यांच्या नावांची शहरात चर्चा आहे. (प्रतिनिधी)