शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

टेम्पोनं दिली दुचाकीला जोरदार धडक, दोघांचा जागीच मृत्यू; गावकरी संतापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2022 21:21 IST

उन्हाळे कुंभारवाडी येथे आयशर टेम्पो व दुचाकीचा भीषण अपघात, महामार्ग ठेकेदाराच्या कामातील दिरंगाईचा फटका

राजापूर  - मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर उन्हाळे कुंभारवाडी धबधब्यानजीक गोव्याकडून भरधाव वेगात येणाऱ्या आयशर टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक देत चिरडल्याने झालेल्या अपघातामध्ये दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले आहेत. बाजीराव डोंगळे . ५२ रा.हातिवले व विजय हरेश्वर शिंदे .४५, रा.खडपेवाडी, राजापूर अशी या अपघातात मृत्युमृखी पडलेल्या दोन तरूणांची नावे आहेत. गुरूवारी सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या दोन तरूणांच्या अपघाती मृत्युमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

महामार्ग ठेकेदार कंपनीकडून या ठिकाणी संथ गतीने सुरू असलेले काम आणि होणारी दिरंगाई व संबधित यंत्रणेची डोळेझाक यामुळे गेले वर्षभर या ठिकाणी वारंवार अपघात होऊन दुर्घटना घडत असून ठेकेदाराच्या आणि प्रशासनाच्या या बेजबाबदारपणामुळेच या दोघांचा हकनाम बळी गेल्याच्या संतप्त प्रतिक्रीया उमटत आहेत. गेले काही दिवस वारंवार या ठिकाणी अपघात होत आहेत. मात्र संबधित यंत्रणेकडून कोणतीच दखल घेतली जात नसल्याने अशा अपघातात अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत.

या अपघातानंतर अपघातस्थळी काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली. उपस्थित ग्रामस्थांनी ठेकेदाराच्या नावाने शिमगा करत तीव्र नाराजी व्यक्त केली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बाजीराव डोंगळे व विजय शिंदे हे दुचाकी क्रमांक एम एच ०८ ए.बी.०२७७ वरून हातिवले येथून राजापूरला येत होते. हे दुचाकीस्वार हे कुंभारवाडी येथील जितवणे धबधबा येथे आले असता दुचाकीच्या पुढे असलेल्या कंटेनरची साईट घेऊन पुढे येण्याच्या प्रयत्न करत असताना मागून गोवा दिशेकडून भरधाव वेगात येणाऱ्या आयशर टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकी टेम्पोच्या चाकाखाली जाऊन सुमारे १०० ते १२० फुट फरफटत गेली. यामध्ये दुचाकीवरील दोघेही टेम्पोच्या चाकाखाली चिरडले गेल्याने जागीच ठार झाले.

दुचाकीला धडक दिल्यानंतर या आयशर टेम्पोने समोरून येणाऱ्या राजापूर-तारळ या एसटी बसलाही या टेम्पोने धडक दिली. सुदैवाने एसटीतील कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नाही. मात्र यात एसटीचे नुकसान झाले आहे. सदरचा आयशर टेम्पो सिंधुदुगार्तून खेड येथे जात होता. या अपघाताला कारणीभुत असलेल्या टेम्पो चालकाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

या अपघाताची खबर मिळताच पोलिसांसांनी तात्काळ घटनस्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांसह पोलीस कर्मचारी तसेच या परिसरातील अनेक स्थानिक ग्रामस्थ, वाहक चालकांनीही अपघातस्थळी धाव घेतली. तर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, नगरसेवक सौरभ खडपे आदींसह अनेकांनी या अपघातील या दोन मृत तरूणांना बाहेर काढुन खासगी रूग्णवाहीकेने या दोघांचेही मृतदेह राजापूर ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत अपघाताची नोंद करण्याची कार्यवाही पोलीसांकडून सुरू होती. या अपघातात ठार झालेला विजय उर्फ बंडया शिंदे हा होतकरू तरूण होता. तो हातिवले येथे एका खासगी कंपनीत कामाला होता. कामावरून घरी परतत असताना काळाने हा घाला घातला व त्यातच त्याचा दुदैवी मृत्यू झाला.