शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कुणबी समाजाच्या आरक्षणाबाबत चर्चा करणार

By admin | Updated: September 12, 2014 23:36 IST

शिष्टमंडळाची भेट : आता कोणता निर्णय होणार याकडे लक्ष

चिपळूण : तिल्लोरी कुणबी समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, यासाठी कोकण तिल्लोरी कुणबी आरक्षण संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा केली. आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर असल्याने याबाबत चर्चा करुन निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री चव्हाण यांनी दिले. या समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर कोकण तिल्लोरी कुणबी आरक्षण समितीने मोर्चा काढला होता. सर्व समाजबांधव एकत्र आल्याने या मोर्चालाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. याची दखल मंत्रालय स्तरावरही घेण्यात आली. त्यामुळे संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावण्यात आले होते. कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली कोकण तिल्लोरी कुणबी आरक्षण संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी ज्येष्ठ नेते दादा बैकर, गोपिनाथ झेपले, राजाभाऊ कातकर, दौलत पोस्टुरे, शंकर कवणकर, अ‍ॅड. सुजित झिमण, सुनील पवार, चंद्रकांत परवडी, वसंत उदेग, रमेश राणे, गणपत गावकर, तुषार परवडी आदी उपस्थित होते. समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर केले. मुख्यमंत्री चव्हाण यांनी आरक्षणासाठी आयोग नेमण्याची तयारी दर्शविली. परंतु, त्याला शिष्टमंडळाने विरोध केला. कारण आजपर्यंत ५ समित्या नेमण्यात आल्या. त्याचे काय झाले? ते कोणालाच समजले नाही. स्वातंत्र्यानंतरही या समाजाचा प्रश्न सुटलेला नाही, ही बाबही निदर्शनास आणून दिली. आरक्षणाचा प्रश्न लवकरच सोडवावा, अशी मागणीही या शिष्टमंडळाने केली आहे. या मागणीबाबत काय होणार इकडे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)