शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कायदा हातात घेऊन शासनाला अद्दल घडवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 00:25 IST

राजापूर : कोकणची राखरांगोळी करणारे प्रकल्प लादण्याचे प्रयत्न झाले तर ते अजिबात खपवून घेणार नाही. प्रसंगी हातात कायदा घेऊन शासनाला अद्दल शिकविल्याशिवाय राहणार नाही’, असा हल्लाबोल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.वादग्रस्त नाणार प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सागवे येथील कोचाळी मैदानावर प्रकल्पग्रस्तांसाठी सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.कोकण हा निसर्गरम्य ...

राजापूर : कोकणची राखरांगोळी करणारे प्रकल्प लादण्याचे प्रयत्न झाले तर ते अजिबात खपवून घेणार नाही. प्रसंगी हातात कायदा घेऊन शासनाला अद्दल शिकविल्याशिवाय राहणार नाही’, असा हल्लाबोल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.वादग्रस्त नाणार प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सागवे येथील कोचाळी मैदानावर प्रकल्पग्रस्तांसाठी सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.कोकण हा निसर्गरम्य आहे; मात्र कोकणात विनाशकारी प्रकल्प आणून या भूमीची राख करण्याचे षङयंत्र रचण्यात आले असून, शिवसेना त्याला विरोध करील अशा शब्दात त्यांनी ठणकावून सांगितले. मुख्यमंत्र्यांनी गुजरात काय किंवा नागपूर काय, त्यांना हवा तिकडे हा प्रकल्प न्यावा; पण असा विनाशकारी प्रकल्प कोकणात नको. आमच्या निसर्गाला धोका करणारे प्रकल्प आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. उद्योगमंत्र्यांनी ती अधिसूचना रद्द केल्याची घोषणा केली आहे. आता येथील भूमीत तो प्रकल्प होणार नाही. नाणार परिसरातील शेतकरी बांधव, बागायतदार, मच्छिमार यांना देशोधडीला लावून कोकणचा विकास नको आहे, असे ठाकरे म्हणाले.नाणार परिसरात मोदी, शहा, जैन अशी मंडळी कधीच वास्तव्याला नव्हती. मग आता ही मंडळी कोठून? परप्रांतातील मंडळींना अगोदर प्रकल्पाची माहिती कशी मिळाली? असे सवाल उपस्थित करीत त्यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला.यावेळीे उद्योगमंत्री सुभाष देसाई, बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, पालकमंत्री रवींद्र वायकर, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, सेनेचे सचिव व खासदार विनायक राऊत, सेनेचे विधानसभेतील पक्षप्रतोद आमदार सुनील प्रभू, आमदार वैभव नाईक, आमदार सदानंद चव्हाण, आमदार उदय सामंत, आमदार तृप्ती सावंत, आमदार राजन साळवी, आमदार सत्यजित पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार उल्हास पाटील, जिल्हा संपर्कप्रमुख विजय कदम, जिल्हाप्रमुख राजेंद्र्र महाडिक, सचिन कदम, गौरीशंकर खोत, माजी मंत्री रवींद्र्र माने, माजी आमदार गणपत कदम, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्नेहा सावंत यासहित सेनेचे पदाधिकारी तसेच रिफायनरीविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष कमलाकर कदम, मज्जीद भाटकर, नाणारचे सरपंच ओमकार प्रभुदेसाई, भाई सामंत यासहित प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.सभेकडे अनेक प्रकल्पग्रस्तांची पाठनाणार प्रकल्पातील भूसंपादनाची अधिसूचना रद्द न करण्यात आल्याने प्रकल्पग्रस्तांनी शिवसेना पक्षप्रमुखांच्या सभेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला होता. त्याप्रमाणे अशोक वालम यांच्या गटाचे प्रकल्पग्रस्त या सभेकडे फिरकलेही नाहीत. मात्र, भाई सामंत यांच्या गटाचे प्रकल्पग्रस्त सभेला उपस्थित होते. या सभेला नाणारबाहेरील शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांना कुणी विचारत नाहीजर स्थानिकांचा विरोध असेल तर प्रकल्प लादणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आपल्याला दिले होते. मात्र, केंद्र्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सौदीशी सामंजस्य करार केला. त्यावरून मुख्यमंत्र्यांना कुणीच विचारीत नाही व त्यांच्या शब्दाला दिल्लीत कवडीचीही किंमत नसल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली.उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणार प्रकल्पाच्या भूसंपादनाची काढलेली अधिसूचना रद्द केल्याची घोषणा करताच प्रकल्पग्रस्तांनी शिवसेना पक्षप्रमुखांचे जाहीर आभार व्यक्त केले.