शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करणा

By admin | Updated: September 7, 2014 00:34 IST

प्रमोद शेवाळे : सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांची गय करणार नाही

चिपळूण : विधानसभा निवडणुकीच्या काळात कोणीही आतताईपणा केला किंवा कायदा व सुव्यवस्था बिघडवून सामाजिक स्वाथ्याच्या हितास बाधा आणण्याचा प्रयत्न केल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही. परिस्थितीनुसार निर्णय घेवून कायद्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल, असा इशारा अप्पर पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी दिला. अप्पर पोलीस अधिक्षक शेवाळे यांच्याकडे निवडणूक व गणेशोत्सव काळातील जबाबदारी देण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर व खेडचा काही भाग हा संवेदनशील आहे. याबाबतची माहिती आपण घेत आहोत. जिल्ह्यातील हिस्ट्रीसिटर किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांची माहिती घेवून त्यानुसार परिणामकारक कारवाई केली जाईल. ही कारवाई पारदर्शक असेल. विनाकारण कोणालाही त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. निवडणुकीच्या काळात आम्ही निवडणूक आयोगाला उत्तर देण्यास बांधिल असतो. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.निवडणुकीच्या काळात आता बरीच सुधारणा झाली आहे. रात्री १० वाजता प्रचार संपतो किंवा ध्वनीप्रदूषणाचा विचार करुन ध्वनीक्षेपकावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे लोकांनाही त्याची सवय लागली आहे. निवडणुकीच्या काळात क्रियाशील कार्यकर्ते किंवा अगदी पोलिंग एजंट कोण याचीही माहिती घेवून त्याचा इतिहास तपासला जाईल. म्हणजेच अगदी ‘ग्रासरुट’पर्यंत पोलीस खाते काम करील. हद्दपारी, प्रतिबंधात्मक कारवाई, नोटीसा अशा आयुधांचा वापरही पोलीस खाते करणार आहे. आपण धुळे, गडचिरोली, मालेगाव, नाशिक अशा भागात काम केले आहे. तेथील अनुभव आपल्या पाठीशी आहे. निवडणुकीच्या काळात एखादा निर्णय कठोरपणे घेताना पोलिसांवर कोणताही राजकीय दबाव नसेल. कारण या खात्यात काम करताना सर्वप्रकारची तयारी ठेवावी लागते. शिवाय गडचिरोली ते सिंधुदुर्ग या पलिकडे कोणी पाठविणार नाही त्यामुळे आम्ही आमचे काम प्रामाणिकपणे करु. निवडणुका शांततामय वातावरणात पार पडतील असा विश्वास अप्पर पोलीस अधिक्षक शेवाळे यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)