शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सेस कराचा निर्णय स्थगित

By admin | Updated: August 21, 2016 22:26 IST

उदय सामंत : १५ दिवसात मच्छीमार-बाजार समितीची बैठक

रत्नागिरी : कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सेस कराबाबत निर्णय अमलात आणण्याआधी येत्या १५ दिवसात मच्छीमार व कृषी उत्पन्न बाजार समितीची बैठक आयोजित करून त्यात तोडगा काढला जाईल. तोपर्यंत २२ आॅगस्टपासून अंमलबजावणी होणाऱ्या सेस कराच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. याबाबत समितीचे सभापती गजानन पाटील यांच्याशी आपली चर्चा झाल्याची माहिती आमदार उदय सामंत यांनी पत्रकारपरिषदेत दिली. सेस कराच्या निर्णयाविरोधात मच्छीमार नेत्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. यामुळे मच्छीमारांमध्ये प्रचंड असंतोष माजला होता. याबाबत आपण मच्छीमार नेते नुरा पटेल, सुलेमान मुल्ला, शब्बीर वस्ता, नदीम सोलकर, इसा जिवाजी आदींशी चर्चा केली. याबाबत बाजार समिती व मच्छीमारांची बैठक घेऊन चर्चेतूून निर्णय अंतिम करण्याची विनंती केली. त्यानुसार बाजार समिती व मच्छीमार यांची बैठक होईपर्यंत या निर्णयाला स्थगिती देण्याचे सभापती पाटील यांनी मान्य केले आहे. नेपाळी खलाशी व पोलीस यांचे चांगले सहकार्य आहे. मात्र, स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांचे नेपाळी खलाशांबाबत काही गैरसमज आहेत. त्यामुळे ते खलाशी दिसले की, हे पोलीस चालायला लागा, असे सांगतात. याबाबत आपली जिल्हा पोलीस अधीक्षकांबरोबर चर्चा झाली असून, उद्या अधीक्षकांनी दुपारी १२ वाजता याबाबत बैठक आयोजित केली आहे. मिरकरवाडा बंदराच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला स्थगिती दिलेली नाही, काम सुरू आहे. याबाबत आपण बंदरावर जाऊन पाहणी करणार आहोत. मच्छीमारांना दुसऱ्या टप्प्यात प्रथम काय हवे, त्यानुसारच काम होणे आवश्यक आहे. प्राधान्यक्रमाची कामेच प्रथम सुरू करण्यास सांगणार असल्याचे सामंत म्हणाले. अल्ट्रा टेक कंपनीच्या वाहतुकीमुळे रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे भरण्याची जबाबदारी त्या कंपनीची आहे. येत्या आठ दिवसात कंपनीने हे खड्डे भरावेत, अन्यथा वाहतूक करू दिली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. (प्रतिनिधी)