शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

पुरात अडकलेल्या तरुणाला वाचवले

By admin | Updated: September 25, 2016 00:55 IST

संततधार पाऊस : कंट्रोल रुमला पुराच्या पाण्याचा वेढा

देवरुख : गेले दोन दिवस पडणाऱ्या संततधार पावसाने संगमेश्वर तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर धामणीनजीक नदीच्या पुरामुळे एअरटेल कंपनीच्या कंट्रोल रुममध्ये अडकलेल्या तरुणाला शुक्रवारी राजू काकडे हेल्प अ‍ॅकॅडमीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या जिकरीने बाहेर काढले. संगमेश्वरनजीक धामणी गावातील ग्रामपंचायत कार्यालय बहुउद्देशीय सभागृहाच्या बाजूला एअरटेल कंपनीचा टॉवर असून, तेथे असणाऱ्या कंट्रोल रुममध्ये विनोद गुरव हा सुरक्षारक्षक अडकला होता. रुमच्या चहुबाजूने पाण्याचा वेढा असल्याने तो वाचविण्यासाठी धावा करीत होता. शुक्रवारी रात्री नदीला मोठा पूर आला होता. अखेर रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास स्थानिक ग्रामस्थ बाळकृ ष्ण बसवणकर यांनी एअरटेल कंट्रोल रुमच्या दिशेने झेप घेत गुरव यांच्यापर्यंत जाण्यात यश मिळविले. मात्र, याच दरम्यान वाढत्या पावसामुळे नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढत गेल्याने उपस्थित ग्रामस्थांनी त्याला बाहेर येऊ नको, असा सल्ला दिला. याचवेळी देवरुखच्या राजू काकडे हेल्प अ‍ॅकॅडमला देवरुख आपत्कालीन विभागाने हा सुरक्षारक्षक अडकल्याची माहिती दिली. आपत्कालीन विभागाची टीम ११ वाजेपर्यंत घटनास्थळी दाखल झाली. यावेळी राजा गायकवाड या धाडसी कार्यकर्त्याने मुख्य मार्गापासून अडकलेल्या तरुणापर्यंत जात मोठी जोखीम पत्करत त्याला सुरक्षित बाहेर काढले. राजा गायकवाड यांच्यासह गणेश जंगम, दिलीप गुरव, युुयुत्सू आर्ते, अण्णा बेर्डे, बंधू बेर्डे, सतीश खातू, राजू वणकुर्दे, वैभव आंबवकर, निरंजन बेर्डे, जयवंत वाईरकर, आदी कार्यकर्ते या बचाव मोहिमेत सहभागी झाले होते. यावेळी तहसील विभागाचे शैलेश जाधव, पंचायत समिती सदस्य रुपेश शेट्ये, मनसे तालुकाध्यक्ष अमित ताठरे उपस्थित होते. तुरळ, कडवई, कुचांबे, कसबा, धामणी, आरवलीतील ग्रामपंचायत कार्यालयांसह येथील काही घरांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. भिरकोंडमध्येदेखील पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. (प्रतिनिधी)