शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

दूषित पाण्याची यंत्रणेकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2016 00:34 IST

सोनपात्रा नदी : ग्रामपंचायतीला कल्पना दिली नसल्याची कबुली--लोकमतचा प्रभाव

आवाशी : कोतवली येथील सोनपात्रा नदीत सोडलेल्या दूषित पाणी प्रकरणाकडे शासकीय यंत्रणेने केलेल्या दुर्लक्षाबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली असून, काही अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केल्याचे सांगितले. मात्र, याबाबत कोतवली ग्रामपंचायतीला कल्पना दिली नसल्याची कबुलीदेखील ‘त्या’ अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली. लोटे - परशुराम औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखान्यांमधून दि. २४ मे रोजी रात्री कोतवली येथील सोनपात्रा नदीत दूषित सांडपाणी सोडले गेले. ही बाब दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आली. गावातील काही जनावरे हे दूषित पाणी प्यायली तसेच गावातील पाणवठेही यामुळे दूषित झाल्याचे पहावयास मिळाले. ग्रामपंचायतीने एम.पी.सी.बी., एम.आय.डी.सी., सी.ई.टी.पी.ला याची माहिती दिली. मात्र, या घटनेची दखल वरीलपैकी कोणीही घेतली नाही. अखेर ग्रामपंचायतीने खेड तहसीलदारांकडे संपर्क साधून या घटनेचा पंचनामा केला. याबाबत लेखी तक्रार ग्रामपंचायतीने खेड तहसीलदार यांचेकडे केली आहे.असे प्रकार वारंवार होत असताना वरील यंत्रणेला कळवूनही ते दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामपंचायतीने केला आहे. त्याचबरोबर अनेकदा पंचनामे करूनही त्याचा अहवाल आजपर्यंत ग्रामपंचायतीला प्राप्त झालेला नाही. त्यामुळे आता तयार करण्यात आलेला अहवाल हा लेखी स्वरुपात मिळण्याची मागणीही केली आहे. ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच संबंधित यंत्रणा खडबडून जागी झाली. आम्ही लगेचच घटनास्थळावर जाऊन आलो होतो. तसेच गेले तीन दिवस आम्ही त्या ठिकाणी पाहणी केल्याचे, सी.ई.टी.पी.च्या एका अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, याबाबत तेथील ग्रामपंचायतीला कल्पना दिली नसल्याचेही त्यांनी सांगितले. पाहणी करून आपण अहवाल तयार केल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. याबाबत एम.आय.डी.सी. व एम.पी.सी.बी. यांचेकडे संपर्क साधला असता, अधिकाऱ्यांनी भ्रमणध्वनीवर प्रतिसाद दिला नाही. (वार्ताहर)पुन्हा तसाच प्रकार : चेंबर ओव्हरफ्लोचार दिवसांपूर्वी सोनपात्रा नदी दूषित झाली असतानाच तसाच प्रकार पुन्हा घडल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. लोटे गावची स्मशानभूमी व जुनी बंद असणारी काणेकर इंडस्ट्रीज यालगत असणारे सी.ई.टी.पी.मध्ये सांडपाणी वाहून नेणारे एम.आय.डी.सी.चे चेंबर ओव्हरफ्लो होऊन वाहत असल्याचे प्रवीण कदम व जितेंद्र आंब्रे यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी ही बाब सी.ई.टी.पी.ला कळविल्याचे सांगितले.