शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’चं ‘सरप्राईज गिफ्ट न विसरण्याजोगं

By admin | Updated: July 7, 2016 00:39 IST

वैष्णवी पवार : ‘संस्कारांचे मोती’ने वाचनाची आवड लावली अन् बरंच काही...!

आनंद त्रिपाठी-- वाटूळ --लोकमत आयोजित संस्कारांचे मोती स्पर्धेत इयत्ता पाचवीपासून सातत्याने सहभागी होत होते. मला पियानोचं बक्षीस मिळालं, तेव्हा हे सरप्राईज गिफ्ट मला खूपच भावलं. आयुष्यात एवढं मोठं मिळालेलं बक्षीस मी कधीच विसरू शकणार नाही आणि नकळतपणे ‘लोकमत’ने मला वाचनाची आवडही लावली, ती ‘संस्कारांचे मोती’ची शिदोरी आहे, असे मत आदर्श विद्यामंदिर, वाटूळ (ता. राजापूर)ची विद्यार्थिनी वैष्णवी धनंजय पवार हिने व्यक्त केले.गेल्या वर्षी ‘लोकमत’ आयोजित संस्कारांचे मोती उपक्रमात वैष्णवीला तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले. त्याबद्दल ती म्हणाली की, आजपर्यंत मी लोकमतच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घेतला. परंतु प्रमाणपत्र वगळता कोणतेही बक्षीस मिळत नव्हते. परंतु लोकमतमुळे वाचनाची गोडी मात्र लागली होती. गतवर्षी जुलैमध्ये सुरु झालेल्या संस्कारांचे मोती स्पर्धेत पुन्हा नव्याने सहभागी झाले. शाळेत स्पर्धेचा निकाल आला, आमचे शिक्षक आनंद त्रिपाठी यांनी सर्व विद्यार्थ्यांसमोर मला स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचे बक्षीस पियानो मिळाल्याचे जाहीर केले अन् माझा आनंद गगनात मावेनासा झाला. प्रथमच मला एवढे चांगले बक्षीस मिळाले होते. ज्या बक्षिसाची अपेक्षा होती, तेच बक्षीस मला मिळाल्याने आनंद द्विगुणित झाला. कधी एकदा तो पियानो घेऊन घरी जाते व आईला दाखवते ही उत्कंठा मनाला लागली होती, असे ती म्हणाली.‘लोकमत’च्या स्पर्धेत हमखास बक्षीस मिळते, याची शाश्वती आईलाही आली. तिने लागलीच बाबांना ही आनंदाची बातमी सांगितली. लोकमतच्या स्पर्धेमुळे पेपर वाचनाची आवड निर्माण झाली. संस्कारांचे मोती या पानावर छापून येणाऱ्या वैविध्यपूर्ण माहितीचे संकलन करुन शाळेसाठी एक छान प्रकल्प तयार केला असून, त्या प्रकल्पाचे सर्व शिक्षकांनी कौतुक केले. स्पर्धा संपल्यानंतर पुन्हा स्पर्धा कधी सुरु होईल, याची उत्सुकता माझ्या मैत्रिणींनाही लागून राहिली होती, असे वैष्णवी म्हणाली.शाळेतून घरी येत असताना वैष्णवीच्या हातात मोठी वस्तू पाहून मलाही उत्सुकता लागली. मला पाहताच वैष्णवी धावत आली व लोकमत स्पर्धेत पियानो मिळाल्याची गोड बातमी दिली. तिचा आनंद पाहून मलाही खूप भरुन आले. तिची जिद्द, आत्मविश्वास व चिकाटी मी जवळून पाहात होते. न चुकता संध्याकाळी अभ्यासाबरोबरच पेपर वाचून कुपन चिकटविणे हा तिचा नित्यक्रम असे. मी गृहिणी असल्याने संस्कारांचे मोतीमधील विविध माहितीचे मोठ्याने वाचन करून ती मला ऐकवत असे. तिच्यामुळे मलाही पेपर वाचण्याची सवय निर्माण झाली.- ममता धनंजय पवार, आईमला मिळालेल्या पियानोचा उपयोग आम्ही शालेय परिपाठावेळी आमची प्रार्थना संगीतबद्ध करण्यासाठी करतो. पियानोच्या लयबध्द तालावर आमचा परिपाठ होत असतो. मला बक्षीस मिळाल्याचे माझ्या आई - बाबांनाही खूप कौतुक वाटते. त्यांनी मला ‘लोकमत’ स्पर्धेमध्ये यंदाही सहभागी होण्याची परवानगीही दिली आहे. सध्या आदर्श विद्यामंदिर, वाटूळ येथे इयत्ता आठवीत शिकत असलेल्या वैष्णवीला पोलीस दलात नोकरी करण्याची इच्छा आहे.- वैष्णवी धनंजय पवार, आदर्श विद्यामंदिर, वाटूळ