देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील आंबा - काजू बागायतदारांना नुकसानभरपाई मिळावी, यासाठी हालचाली वेगाने सुरू आहेत. भरपाईपासून वंचित असलेल्या बागायतदारांसाठी ही खुषखबर असून, याबाबतची पुरवणी यादी पुन्हा वरिष्ठस्तरावर पाठविण्यात आली आहे. ३ कोटी ८५ लाख २९ हजार ५७४ रूपयांचा निधी तालुक्यासाठी मिळावा, असे यामध्ये नमूद करण्यात आले आहे. गतवर्षी कोसळलेल्या पावसामध्ये आंबा - काजू बागायतदारांचे नुकसान झाल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला होता. यावेळी नुकसानीचे पंचनामे तलाठ्यांकडून करण्यात आले. नुकसानभरपाईपोटी संगमेश्वर तालुक्याला १३ कोटी ८५ लाख २२ हजार ५०० रूपयांचा निधी मिळाला. यातील ११ कोटी ३ लाख ७५ हजार ६७६ रूपयांचे वाटप करण्यात आले. ३१ मार्चपर्यंत लाभार्थ्यांनी कागदपत्र सादर न केल्याने यातील २ कोटी ८१ लाख ४६ हजार ८२४ रूपयांचा निधी पुन्हा शासनदफ्तरी जमा झाला.नुकसानग्रस्त आंबा - क ाजू बागायतदारांना ही नुकसानभरपाई मिळावी यासाठी शासनाची धडपड सुरू असल्याचे दिसून येत आहे. नुकसानभरपाईपासून वंचित असलेल्यांसाठी ही पुरवणी यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये ९५ गावांमधील बागायतदारांचा समावेश आहे. १ कोटी ३ लाख ८२ हजार ७५० रूपये व शासनदफ्तरी जमा असलेले २ कोटी ८१ लाख ४६ हजार ८२४ रूपये अशी ही एकूण ३ कोटी ८५ लाख २९ हजार ५७४ रूपयांची पुरवणी यादी आहे. ही यादी मंजुरीसाठी पुन्हा शासनदरबारी पाठविण्यात आली आहे. या यादीला मंजुरी मिळताच प्रत्येक ग्रामपंचायत, तलाठी कार्यालयात ती प्रसिध्द करण्यात येणार आहे. यासाठी कागदपत्रे सादर करून याचा लाभ वंचित बागायतदारांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)लवकरच मंजुरीपुरवणी यादीला लवकरच मंजुरी मिळणार असल्याची माहिती देवरुख तहसील कार्यालयातून प्राप्त झाली आहे.
भरपाईसाठी पुरवणी यादी
By admin | Updated: July 23, 2016 23:49 IST