शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
8
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
9
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
10
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
11
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
12
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
13
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
14
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
15
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
16
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
17
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
18
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
20
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की

उन्हाच्या झळा पर्यटनाला--

By admin | Updated: May 27, 2016 22:51 IST

कोकण किनारा

गेल्या काही वर्षांपासून कोकणातील पर्यटनाला थोडे बरे दिवस येऊ लागले आहेत. पण, बदलत्या हवामानाचा जो त्रास आंबा आणि मासळीला होत आहे, तसाच त्रास आता पर्यटन क्षेत्रालाही होऊ लागला आहे. यंदा उन्हाळ्याची तीव्रता अधिक वाढल्याने पर्यटनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. मुलांच्या सुट्यांचा हंगाम असल्याने मे महिन्यातच फिरण्यासाठी म्हणून असंख्य लोक बाहेर पडतात. पण, यंदा उष्मा वाढला असल्याने गणपतीपुळे, गुहागर, दापोली यांसारख्या प्रमुख ठिकाणीही फार गर्दी झाली नाही आणि व्यावसायिकांवर कपाळाला हात लावण्याची वेळ आली.सात - आठ वर्षांपूर्वी नाताळला जोडून चार - पाच सुट्ट्या आल्या होत्या. साहजिकच गोव्यात प्रचंड गर्दी झाली. राहण्यासाठी छोटीशीही जागा मिळत नव्हती म्हणून असंख्य पावले कोकणाकडे वळली. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावरील भागातील हॉटेल्सना जोरदार प्रतिसाद मिळाला. त्या वर्षीपासून कोकणातील गर्दी वाढू लागली आहे, ती सातत्याने सुरूच आहे. इंटरनेटचा प्रभाव वाढू लागल्याचाही फायदा या पर्यटनस्थळांना होत आहे.रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील सर्वाधिक प्रतिसाद मिळणारी पर्यटनस्थळे म्हणजे समुद्रकिनारी असलेली गावे. त्यातही सिंधुदुर्गातील तारकर्ली (मालवण), वेंगुर्ला, रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे, गुहागर आणि दापोली या ठिकाणी गर्दीचे प्रमाण अधिक असते. १५ एप्रिलनंतर अगदी १0 जूनपर्यंत या सर्व ठिकाणी पर्यटकांची जा-ये सुरू असते. दळणवळणाच्या वाढत्या सुविधा, खासगी वाहनांची वाढणारी संख्या लक्षात घेता यंदाही चांगली गर्दी त्या - त्या ठिकाणच्या व्यावसायिकांना होती. मात्र, त्या साऱ्यांचीच निराशा झाली आहे. यंदा पर्यटकांचा प्रतिसाद अपेक्षेच्या १0 ते २0 टक्के इतकाच आहे. गर्दी होण्याच्या अपेक्षेने व्यावसायिकांनी अनेक गोष्टींची आगाऊ तयारी केली होती. मात्र, या साऱ्यावर उष्म्याचा वरवंटा फिरला आहे. अपेक्षित गर्दीच्या १0 ते २0 टक्के इतकाच प्रतिसाद मिळाल्यामुळे व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.उष्म्याचे वाढते प्रमाण हा जागतिक समस्येचाच विषय आहे. पण कोकण आजवर त्याला काही प्रमाणात तरी अपवाद होता. मोठमोठाल्या डोंगरांवरील झाडीमुळे कोकणात या दिवसात अगदी थंडावा नसला तरी असह्य होणारा उकाडाही जाणवत नव्हता. पण, आता परिस्थिती बदलली आहे. कधी वस्ती वाढत गेल्याने तर कधी सरपण, फर्निचरची गरज म्हणून आपण बेसुमार वृक्षतोड केली आहे. डोंगर उघडेबोडके पडू लागले आहेत. या साऱ्याचा परिणाम हवामानावर झाला आहे. जिकडे पाहावं तिकडे सिमेंटची जंगले उभी राहात आहेत. शहरी भागात तर इमारतींसाठीही जागा शिल्लक राहिलेल्या नाहीत, अशी स्थिती आहे. झाडंच नसतील, तर पर्यावरण तरी संतुलीत राहणार कसे?वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन ही आता केवळ सरकारी मोहीम न राहता लोकचळवळ होण्याची गरज आहे. वृक्ष लागवडीअभावी बसणाऱ्या झळा आता आपल्या प्रत्येकाच्या घरापर्यंत येऊन पोहोचल्या आहेत. त्यामुळे आता तरी त्यावर गांभीर्याने काम होणे अपेक्षित आहे.पर्यटनस्थळांच्या समस्यांचा विचार करता वीजपुरवठा हाही एक महत्त्वाचा भाग आहे. अलिकडच्या काळात भारनियमन हा शब्द आपण विसरून गेलो आहोत. महानिर्मितीचे वीजनिर्मिती प्रकल्प नेटकेपणाने सुरू आहेत, त्याचे वितरण सुयोग्य पद्धतीने होत आहे. त्यामुळे मागणी वाढूनही भारनियमनाची वेळ आपल्यावर आलेली नाही. पण, पर्यटनस्थळांना विनाखंड वीज उपलब्ध होणे गरजेचे आहे. दोन दिवसांपूर्वी गणपतीपुळेमध्ये रात्री खंडित झालेला वीजपुरवठा दुसऱ्या दिवशी सकाळी सुरळीत झाला. जवळजवळ सर्वच पर्यटकांनी हॉटेल मालकांशी वाद घातला. काही पर्यटकांनी हॉटेल मालकांकडून पैसे परत घेतले. मनस्ताप आणि थेट आर्थिक नुकसान असा दोन्ही बाजूंचा त्रास व्यावसायिकांना झाला. ज्यावर खूप मोठी आर्थिक गणिते अवलंबून आहेत, अशा पर्यटनस्थळांना विनाखंड वीजपुरवठा आणि पाणी पुरवठा करण्यावर खरंतर भर असायला हवा. जिल्हा नियोजन समितीपुढे तसा प्रस्ताव जायला हवा. पण रत्नागिरीचे राजकारणी अशाबाबत खूप उदासीन आहेत. या राजकीय उदासीनतेचाच फटका सर्वसामान्यांना वारंवार सहन करावा लागत आहे.