शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नवदाम्पत्याची कापडगावात आत्महत्या

By admin | Updated: July 17, 2014 23:53 IST

आत्महत्येमागचे कारण गुलदस्त्यात

रत्नागिरी : तालुक्यातील पालीजवळील कापडगाव कुरतडकरवाडीत आज (गुरुवार) दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास नवदाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे खळबळ उडाली असून, या दाम्पत्याच्या आत्महत्येमागील कारण स्पष्ट झालेले नाही. प्रथमेश रमेश कुरतडकर (२७) व अर्पिता प्रथमेश कुरतडकर (२२) असे या पती-पत्नीचे नाव आहे. रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रथमेश व अर्पिता यांचे अलिकडेच लग्न झाले होते. नेहमीप्रमाणे आज प्रथमेशचे आई-वडील शेतावर कामासाठी गेले. या दोघांनीही त्यांना आपण दुपारी १२ वाजेपर्यंत शेतावर येऊ, असे सांगितले होते. मात्र, उशीर झाला तरी ते शेतावर का आले नाहीत, म्हणून वडील एक वाजण्याच्या सुमारास घरी आले. घराचा दरवाजा बंद होता. त्याला आतून कडी लावलेली असल्याचे लक्षात आल्यानंतर रमेश कुरतडकर यांनी प्रथमेशला हाका मारल्या. बराचवेळ आतून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने वडील चिंतेत पडले. त्यानंतर दरवाजा उघडून त्यांनी घरात प्रवेश केला.प्रथमेश व अर्पिता हे दोघेही बेडरुममध्ये घराच्या अ‍ॅँगलला नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आल्याने त्यांना धक्काच बसला. त्यानंतर गावच्या पोलीसपाटील यांना घटनेची माहिती दिल्यानंतर ग्रामीण रुग्णालयाचे पोलीस अधिकारी व पाली दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. एन. पाटील अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)