शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत खुनी पतीची कोठडीत आत्महत्या

By admin | Updated: August 31, 2014 00:34 IST

चादरीने घेतला गळफास : मिरज येथे इन कॅमेरा होणार शवविच्छेदन, दारूच्या नशेत पत्नीचा केला खून

रत्नागिरी : दारूच्या नशेत पत्नीच्या डोक्यात गाडीचा लोखंडी पाटा घालून तिला ठार मारणाऱ्या अंकुश महादेव वेलोंडे (वय ४०, मधलीवाडी-ओरी) याने शहर पोलीस स्थानकाच्या कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली. या आरोपीचा मृतदेह विच्छेदनासाठी मिरजच्या मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आला आहे. अंकुशने दारूच्या नशेत काल, शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पत्नी अस्मिता हिच्या डोक्यात गाडीचा लोखंडी पाटा घालून ठार मारले. त्यावेळी आरोपीची तीन मुले आणि आई समोर होती. या घटनेने ओरी परिसर हादरुन गेला. पत्नीचा खून केल्यानंतर पलायन करणाऱ्या अंकुशला पोलिसांनी पकडले. त्याला शहर पोलीस स्थानकातील कोठडीत ठेवण्यात आले होते. आज, शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कोठडीसमोर पहारा देत असलेल्या पोलिसांना तो कोठडीत दिसला नाही. त्याला हाका मारुनही आतून काहीच उत्तर येत नसल्याचे लक्षात येताच पहारेकरी पोलिसांनी इतर सहकाऱ्यांना बोलावले. त्यानंतर कोठडीचे कुलूप उघडून पाहिले असता, अंकुश शौचालयात गळफास लावलेल्या स्थितीत आढळला.आरोपीला झोपण्यासाठी पांघरण्यास दिलेल्या चादरीचा त्याने आत्महत्या करण्यासाठी वापर केला होता. त्याने शौचालयाच्या खिडकीच्या बीमला चादर बांधली आणि तिचा फास घेतला. पोलिसांनी त्याला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तो मृत असल्याचे घोषित केले.घटनेनंतर शहर पोलिसांनी तत्काळ आरोपीच्या नातेवाइकांना बोलावून घेतले. आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याने त्याचा मृतदेह विच्छेदनासाठी मिरज (सांगली) येथील मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आला. तेथे इन कॅमेरा शवविच्छेदन केले जाणार आहे. त्यावेळी पोलिसांबरोबर दोन नातेवाईकही गेले आहेत. (शहर वार्ताहर)पोलिसांची चौकशी होणार..आरोपीच्या पोलीस कोठडीतील आत्महत्येने पोलीस अडचणीत आले आहेत. या घटनेनंतर पोलिसांची सुरुवातीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून प्राथमिक चौकशी होणार आहे. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांना सीआयडी चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.