शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

सावर्डेनजीक तिघे बुडाले, दोघांचे मृतदेह सापडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 23:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसावर्डे (चिपळूण) : गणेश विसर्जनासाठी पºयाची साफसफाई करण्यासाठी गेलेल्या अकरा तरूणांपैकी एका शाळकरी विद्यार्थ्यासह तिघेजण बुडल्याची घटना चिपळूण तालुक्यातील आबीटगाव येथे घडली.शंतनू शांताराम दुर्गवले (१४) आणि रोहीत तुकाराम दुर्गवले (२३) यांचे मृतदेह मिळाले असून, संकेत शांताराम धावडे (२३) याचा शोध उशिरापर्यंत सुरू होता. पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन उद्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कसावर्डे (चिपळूण) : गणेश विसर्जनासाठी पºयाची साफसफाई करण्यासाठी गेलेल्या अकरा तरूणांपैकी एका शाळकरी विद्यार्थ्यासह तिघेजण बुडल्याची घटना चिपळूण तालुक्यातील आबीटगाव येथे घडली.शंतनू शांताराम दुर्गवले (१४) आणि रोहीत तुकाराम दुर्गवले (२३) यांचे मृतदेह मिळाले असून, संकेत शांताराम धावडे (२३) याचा शोध उशिरापर्यंत सुरू होता. पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन उद्या मंगळवारी होत आहे. विसर्जनासाठी आबीटगाव ते तुरंबव हा पºया तसेच गणेश विसर्जन घाट साफ करण्यासाठी आबीटगाव येथील अकरा तरूण सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गेले होते. गेले दोन दिवस जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे पºयाचे पाणी वाहत होते. अकरा तरूणांपैकी तिघेजण साफसफाईसाठी पºयाच्या पाण्यात उतरले आणि उरलेले आठ तरूण गणपती ठेवण्यासाठीची जागा साफ करत होते.साडेपाच वाजण्याच्या सुमारास अचानक पाण्याचा वेग वाढल्यामुळे पºयात उतरून साफसफाई करणारे संकेत, शंतनू आणि रोहीत हे तिघेजण वाहून गेले. काठावर साफसफाई करणाºया तरूणांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी मदतीसाठी इतरांना बोलावले. मदतसाठी आलेल्या लोकांनी या तिघांचाही कसून शोध घेण्यास सुरूवात केली. त्यात शंतनू आणि रोहीतचा मृतदेह हाती लागला आहेत. मात्र संकेत धावडे बेपत्ताच झाला आहे. त्याचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता. या घटनेची माहिती कळताच सावर्डे पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत.गावावर शोककळाअचानक घडलेल्या या प्रकारामुळे गावावर शोककळा पसरली आहे. ममुसळधार पावसातही बहुतांश ग्रामस्थ विसर्जन घाटावर दाखल झाले आहेत. पोलीस तसेच ग्रामस्थ तिसºया बेपत्ता तरूणाचा शोध घेत आहेत.