शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ११७६ गावांतील वीजपुरवठा पूर्ववत करण्यास यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:32 IST

रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका महावितरणला बसला. वीजवाहिन्या, खांब कोसळल्यामुळे जिल्ह्याच्या १,२३९ गावांतील वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. मात्र ...

रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका महावितरणला बसला. वीजवाहिन्या, खांब कोसळल्यामुळे जिल्ह्याच्या १,२३९ गावांतील वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. मात्र सोमवारपासून महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या अविरत प्रयत्नांमुळे आतापर्यंत ११७६ गावांतील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश आले आहे. अद्याप ६३ गावे अंधारात असून, तेथील काम युद्धपातळीवर केले जात आहे.

महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह कंत्राटी कर्मचाऱ्यांची टीम शहरी तसेच ग्रामीण भागात कार्यरत आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत कर्मचारी काम करीत आहेत. जिल्ह्यातील सर्वच्या सर्व ५५ उपकेंद्रे सुरू आहेत. ७,५४८ ट्रान्सफाॅर्मरपैकी ७,०१७ ट्रान्सफाॅर्मर सुरू झाले असून, ५३१ ट्रान्सफाॅर्मर अद्याप दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यातील पाच लाख चार हजार ९२१ ग्राहकांपैकी पाच लाख १७ हजार ५६ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू झाला आहे. ३७ हजार ८६५ ग्राहक मात्र अद्याप अंधारात आहेत.

वादळामुळे उच्चदाबाचे एकूण ४८५ विजेचे खांब पडले होते. पैकी १२५ खांब आतापर्यंत उभे करण्यात आले असले तरी ३६० खांब उभे करण्याचे काम सुरू आहे. लघुदाबाचे एकूण १२३३ खांब पडले होते. पैकी १३३ खांब उभे करण्यात आले असले तरी ११०० खांब अद्याप उभे करणे बाकी आहे.

महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर, कार्यकारी अभियंता रामलिंग बेले, शिवतारे, कैलास लवेकर हे प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी उपस्थित राहून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. जिल्ह्यातील चक्रीवादळामुळे खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी बऱ्यापैकी यश आले आहे. मात्र उर्वरित वीजपुरवठा लवकरच सुरळीत करण्यात येणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.