शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

विषय समित्यांचा ‘खेळ’ खल्लास!

By admin | Updated: January 4, 2017 22:53 IST

ठराव चिठ्ठीवर मंजूर : राजापूर नगरपरिषदेत केवळ स्थायी समिती राहणार

राजापूर : नगर परिषदेत समसमान मते पडल्याने थेट चिठ्ठीद्वारे घेतलेला कौल सत्ताधारी आघाडीच्या बाजूने पडला आणि नगर परिषदेत स्थायी समिती वगळता उर्वरित विषय समित्या निवडण्याचा निर्णय फेटाळण्यात आला. त्यामुळे राजापूर नगरपरिषद विषय समित्यांविना दिसणार आहे. नगराध्यक्ष हे स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असल्याने हनिफ काझी यांची या पदावर निवड झाली आहे. राजापूर नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांसाठी बुधवारी बैठक घेण्यात आली. पालिकेत शिवसेनेचे आठ व एक भाजप असे नऊ एवढे संख्याबळ असून, त्याचवेळी नगराध्यक्ष हनिफ काझी व काँग्रेसचे सात नगरसेवक असे एकूण आठ व एक राष्ट्रवादीचा सदस्य धरुन एकत्रित होणारे संख्याबळ नऊ असे समसमान होते. त्यामुळे कुणाला कोणती समिती मिळणार? याचीच उत्सुकता होती. बुधवारी सकाळी सभा सुरू होताच उपनगराध्यक्ष व काँग्रेसचे गटनेते अ‍ॅड. जमीर खलिफे यांनी केवळ स्थायी समिती वगळता बाकीच्या समित्या रद्द कराव्यात, असा ठराव मांडला. तो ठराव रद्द केला जावा व स्थायीसह सर्व समित्यांची निवड केली जावी, अशी उपसूचना सेनेचे गटनेते विनय गुरव यांनी मांडली.त्यावर सायंकाळी तो ठराव मतदानाला टाकण्यात आला; मात्र दोन्ही बाजूने झालेले मतदान समसमान पडले. त्यामुळे चिठ्ठीचा प्रयोग करण्यात आला व चिठ्ठीत नशिबाने सत्ताधारी काँग्रेसला साथ दिली.जमीर खलिफे यांचा ठराव मंजूर झाला व त्यानंतर स्थायी समितीची स्थापना करण्यात आली. त्या समितीचे अध्यक्ष नगराध्यक्ष हनिफ काझी असतील, तर सदस्यांमध्ये संजय ओगले, स्नेहा कुवेस्कर, प्रतीक्षा खडपे, गोविंद बाकाळकर व शुभांगी सोलगावकर यांचा समावेश आहे. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यासह आता समितीच्या निवडणुकीत सत्ताधारीआघाडीने विजय मिळविला आहे. (प्रतिनिधी)