शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील विद्यार्थी फाड् फाड् इंग्रजी बोलणार...

By admin | Updated: March 19, 2015 23:52 IST

नगर परिषद : चाळीस शाळांना इंग्रजी प्रशिक्षणाची सॉफ्टवेअर प्रदान

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील नगरपरिषदेच्या २१ व अन्य १९ अशा ४० शाळांमधील विद्यार्थी शिक्षणात मागे पडू नयेत, यासाठी रत्नागिरी नगरपरिषदेतर्फे इंग्रजी शिक्षणाचा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी शिक्षणाची अद्ययावत सॉफ्टवेअर्स व पुस्तकांचे संच आज पालिकेतील पॉवर प्रेझेंटेशन कार्यक्रमाच्यावेळी त्या शाळांच्या शिक्षक प्रतिनिधींकडे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. त्यामुळे येत्या काही महिन्यात रत्नागिरीतील विद्यार्थीही फाड फाड इंग्रजी बोलतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.रत्नागिरी नगरपरिषदेच्या शहरातील २२ पैकी २१ शाळा कार्यरत आहेत. शिक्षणातील नवीन तंत्र त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याने या शाळांमध्ये पटसंख्या घसरण्याची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे या शाळांचे आरोग्य सुधारण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेत चार वर्षांपूर्वीच या सर्व शाळांमध्ये संगणक देऊन मुलांना संगणक साक्षर करण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. आता याच संगणकाच्या सहाय्याने नगरपरिषदेच्या २१ व अन्य १९ प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्याना जागतिक भाषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंग्रजी भाषेवर प्रभुत्त्व मिळवण्यासाठी हा खास उपक्रम सुरू करण्यात आला आहे. नगर परिषदेने सुरू केलेल्या या उपक्रमामुळे आता विद्यार्थी पुन्हा नगर परिषद शाळांकडे आकृष्ट होतील, असा विश्वास पालिका सूत्रांनी व्यक्त केला.नगरपरिषदेच्या सभागृहात आज सकाळी ११ वाजता या सॉफ्टवेअरबाबतचे पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशन प्रोजेक्टरदवारे स्क्रीनवर दाखवण्यात आले. यावेळी ४० प्राथमिक शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष मयेकर तसेच उपनगराध्यक्ष संजय साळवी, मुख्याधिकारी एम. बी. खोडके, या प्रकल्पासाठी सॉफ्टवेअर व संच देणारे गुरूकूल संस्थेचे संचालक उमेश नेसवणकर, नगरसेवक उमेश शेट्ये, नगरसेविका राजश्री शिवलकर, शिल्पा सुर्वे, रामेश्वरी धुळप, प्रीती सुर्वे, रशीदा गोदड, पल्लवी राणे उपस्थित होते. (प्रतिनिधी)