शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मावर बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
4
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
5
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
6
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
7
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
8
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
9
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
10
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
11
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
12
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
13
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
14
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
15
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
16
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
17
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
18
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
19
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
20
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही

विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद

By admin | Updated: January 7, 2016 00:40 IST

शेखर निकम : विद्यार्थी संघटनेचा मोर्चा

चिपळूण : उद्याचा खंबीर विद्याविभूषित नागरिक म्हणून ज्या विद्यार्थ्यांकडे पाहिले जाते, त्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करणे हा शासनाचा नाकर्तेपणा आहे. आघाडी सरकारच्या काळात विद्यार्थी हिताच्या अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यात आघाडी शासन यशस्वी झाले. मात्र, युती सरकार सत्तेत आल्यापासून विद्यार्थी देशोधडीला लागला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनी केली. यावेळी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते - पाटील उपस्थित होते. सावर्डे येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयासमोर सावर्डे विभागातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी मोर्चात एकत्र आले होते. यावेळी निकम म्हणाले की, जगामध्ये तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाचे वाढणारे महत्त्व लक्षात घेऊन देशातील अन्य राज्यांमध्ये व्यावसायिक, तांत्रिक शिक्षणाला शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र, राज्य शासनाला विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करुन नेमके काय साधायचे आहे? हे न उलगडलेले कोडे आहे. तातडीने विद्यार्थी शिष्यवृत्ती नव्याने सुरु न केल्यास आगामी काळात राज्य शासनाविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. शासनाच्या विरोधात शिष्यवृत्ती बंद केल्यामुळे विद्यार्थी एकवटत आहेत. कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सुरु केल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते - पाटील यांनी सांगितले. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली सावर्डे, चिपळूण परिसरातील ५०० विद्यार्थी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. यावेळी अशोक विचारे, सुनितकुमार पाटील, तानाजी कांबळे, उमेश लकेश्री, अमित सुर्वे, शकील मोडक, एकनाथ सावर्डेकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)शासनाचा नाकर्तेपणा : विद्यार्थी एकवटलेयुती शासनाविरोधात काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने टिकास्त्र सोडले आहे. शासनाचा नाकर्तेपणा समोर आणण्यासाठी आघाडीकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद केल्याचा मुद्दा यावेळी विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आला.आंदोलनाचा इशाराविद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद केल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. ही शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे.