शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

एसटीची दुचाकीला धडक; दोन ठार

By admin | Updated: January 13, 2017 23:10 IST

मृत रायगडमधील : केळशी येथे दशक्रिया विधीसाठी येत असताना काळाचा घाला

दापोली : दापोली-मांदिवली एसटी बसगाडीने धडक दिल्याने दुचाकीवरील दोघेजण ठार झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी केळशी येथे घडली. दुचाकीस्वार जनार्दन सुर्वे (५८, दिवेआगार), चंद्रकांत महादेव शिरकर (४३, श्रीवर्धन) अशी या दोघा मृतांची नावे आहेत.जनार्दन रामचंद्र सुर्वे हे आपल्या दुचाकीने केळशी येथील नातेवाईकाकडे दशक्रिया विधीसाठी निघाले होते. बाणकोट फेरीबोटीवर सुर्वे यांची चंद्रकांत शिरकर यांची ओळख झाली. आपण आंजर्ले येथे नातेवाईकांकडे उत्तरकार्यासाठी जात असल्याचे सुर्वे यांनी त्यांना सांगितले. ‘आपण दोघे तिकडेच जातोय तर दुचाकीवरून जाऊ या’, असे त्यांच्यात बोलणे होऊन दोघेही दुचाकीवर बसून आले. दोघे दुचाकीवर बोलत गप्पा मारत येत असताना अचानक उंबरशेत रामबाग येथे समोरून दापोली मांदिवली ही बस आली. या गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे दोघेही दुचाकीवरून फेकले गेले. दुचाकीचालक जनार्दन सुर्वे यांना जबर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. चंद्रकांत शिरकर यांच्या डोक्याला गंभीर मार बसला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चंद्रकांतला दोन तासानंतर केळशी प्राथमिक केंद्रात आणण्यात आले. केळशी उपकेंद्रात रुग्णवाहिका नव्हती. त्यामुळे त्यांना दापोलीत उपचारासाठी आणायला तब्बल तीन तास उशीर झाला. या दरम्यान शिरकर यांचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)