शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

कोयना प्रकल्पग्रस्त उपोषणावर ठाम

By admin | Updated: August 14, 2014 22:40 IST

अलोरेत आंदोलन : कोयनेचा प्रश्न अजूनही सुटेना.

शिरगाव : कोयना प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रासाठी ५० वर्षांपूर्वी जमीन संपादित केल्यानंतर शासनाकडून प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या, उद्योगधंद्यासाठी व्यापारी गाळे यापैकी काहीच न देता फसवणूक केली. त्यापुढची स्थिती पाहता संपादित केलेल्या जमिनीवर होणाऱ्या अनधिकृत बांधकामांकडेही शासन डोळेझाक करत आहे. अशा विविध २३ मागण्यांची तातडीने पूर्तता व्हावी, यासाठी १५ आॅगस्ट रोजी अलोरेत उपोषण केले जाणार आहे. पंधरा दिवसांपूर्वी अलोरे - कोळकेवाडी नागावे (ता. चिपळूण) येथील सात प्रकल्पग्रस्तांनी उपोषणाची नोटीस देऊन आपल्या २३ मागण्यांचे निवेदन दिले. त्यावर आठ दिवसांपूर्वी कार्यकारी अभियंता रोकडे यांच्या दालनात दुपारी ३.३० ते रात्री ९ वाजेपर्यंत बैठक घेण्यात आली. नवीनच आलेल्या अधिकाऱ्यांनी प्रत्येक मुद्द्यावर चर्चा केली. त्यानंतर आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना समक्ष धारेवर धरत आजवर केवळ अनधिकृत बांधकामाला नोटीसच का पाठवली? कठोर उपाययोजना का नाही ? असे प्रश्न विचारत कठोर कारवाईबाबत नोटीस काढण्याची सूचना दिली. आजअखेर शासनाची किती रक्कम येणे आहे, असे विचारताच ७५ लाख रुपये वसूल होणे बाकी असल्याचे सांगण्यात आले.प्रत्येक कार्यकाळात तत्कालीन अधिकाऱ्यांनी कोणाच्या दबावाखाली काम केले? शासनाचा महसूल बुडतो, त्याला जबाबदार कोण? निष्कासन दावा चालवण्याचा अधिकार कार्यकारी अभियंत्यांकडे नसताना का चालवला? याची उत्तरे कार्यकारी अभियंता रोकडे देऊ शकले नाहीत. तथापि त्यांनी प्रत्येक मुद्दा शासनाला कळवण्याबाबत त्यांनी आश्वासन दिले. कोणत्याही राजकीय पक्षाचे, नेत्यांचे तूर्त पाठबळ न घेता नव्याने दोन महिन्यांपूर्वी स्थापन झालेली प्रकल्पग्रस्त समिती शासनाच्या केवळ आश्वासनाला बळी न पडता आपल्या उपोषणाबाबतच्या भूमिकेवर ठाम आहे. दि. १५ आॅगस्ट रोजी सकाळी ८ वाजता उपोषण होणारच असल्याची माहिती उपोषणकर्ते नागावे, माजी सरपंच प्रकाश पालांडे यांनी दिली. (वार्ताहर)संपादित केलेल्या जमिनीवरील अनधिकृत बांधकामांकडेही शासनाची डोळेझाक.प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या नाहीत. उद्योगधंद्यासाठी व्यापारी गाळे नाहीत.प्रकल्पग्रस्तांच्या विविध २३ मागण्यांसाठी करण्यात येणार उपोषण.शासनाच्या कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचा उपोषणकर्त्यांचा निर्धार.प्रकल्पामध्ये जमिनी गेल्या की, कोकणातील जमीनमालकांच्या पदरी निराशाच पडते. आतापर्यंत अनेक प्रकल्पांच्या बाबतीत असेच झाल्याने कोकणात नवीन प्रकल्पांना सुरुवातीला विरोध होतो. आता कोयना प्रकल्पाच्या बाबतीतही तोच प्रकार झाला असून, प्रकल्पग्रस्तांमध्ये संतापाचे वातावरण आहे. कोयना प्रकल्प होऊन इतकी वर्षे झाली तरीही मागण्यांची तड लागलेली नाही.