शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

काेराेना संसर्ग राेखण्यासाठी जिल्हाबंदीची काटेकाेर अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:34 IST

राजापूर : तालुक्यात प्रस्तावित असलेले ओणी येथील कोविड रूग्णालय लवकरात लवकर कार्यान्वित करावे, लसीकरणाबाबत तालुक्यात सुयोग्य असे नियोजन करावे़ ...

राजापूर : तालुक्यात प्रस्तावित असलेले ओणी येथील कोविड रूग्णालय लवकरात लवकर कार्यान्वित करावे, लसीकरणाबाबत तालुक्यात सुयोग्य असे नियोजन करावे़ तालुक्यातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाबंदी निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी जाेरदार मागणी शुक्रवारी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आमदार राजन साळवी यांच्याकडे केली.

पुढील आठवडाभरात ओणी येथील कोविड रूग्णालय सुरू करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत़ लसीकरणाबाबत नियोजन करून पात्र लाभार्थींना तातडीने दुसरा डोस देण्याबाबत कार्यवाही करताना ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण प्राधान्याने केले जावे याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही आमदार राजन साळवी यांनी दिली.

राजापूर तालुक्यातील वाढता कोरोना संसर्ग, लसीकरणाबाबत सुरू असलेल्या तक्रारी याबाबत आढावा घेण्यासाठी आमदार राजन साळवी यांनी तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांशी शासकीय विश्रामगृहावर संवाद साधला. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर यांनी जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेली जिल्हाबंदी कागदावरच असल्याचे सांगितले़ स्थानिक व्यापारी, चिरेव्यावसायिक, कामगार यांना बंदी आणि परजिल्ह्यातील येणाऱ्यांना राजरोसपणे सोडले जाते़ ऑनलाईन नोंदणीत तालुक्यालाच प्राधान्य द्यावे अशी मागणी त्यांनी केली़

राजापूर तालुक्यात कोविड रूग्णालय कधी सुरू होणार, आणखी किती बळी गेल्यावर हे कोविड रूग्णालय सुरू होणार असा प्रश्न भाजप तालुकाध्यक्ष अभिजीत गुरव यांनी उपस्थित केला. ग्रामीण भागात कोरोना तपासणी, लसीकरणासाठी लोकांना आणण्यासाठी ५० रिक्षा व्यावसायिकांचे लसीकरण करून त्यांना परवानगी द्यावी, अशी मागणी गुरव यांनी केली. काँग्रेस तालुकाध्यक्ष सुभाष बाकाळकर यांनी रायपाटण कोविड सेंटरमधील गैरसोयींचा पाढा वाचला़ व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर व दीनानाथ कोळवणकर यांनी व्यापाऱ्यांचे व त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण करावे, अशी मागणी केली. आरोग्य विभागातर्फे एम. ए. जाधव व अमित नवरे यांनी लसीकरण व अन्य कामाबाबत माहिती दिली़ अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे, अ‍ॅड. जमीर खलिफे यांनी लसीकरणाबाबत योग्य पद्धतीने नियोजन झाले पाहिजे, अशी मागणी केली.

राजापूर तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष नरेंद्र मोहिते यांनी पत्रकारांचा फ्रंटलाईन वर्कर्समध्ये समावेश करावा आणि त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचे प्राधान्याने लसीकरण करावे, अशी मागणी केली. तर पत्रकार महेश शिवलकर, राजेंद्र बाईत, विनोद पवार, शरद पळसुले देसाई यांनीही तालुक्यातील लसीकरण व कोरोनाच्या अन्य प्रश्नांवर लक्ष वेधले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, शिवसेना शहर प्रमुख संजय पवार, उमेश कोळवणकर, अरविंद लांजेकर, राजन कुवळेकर उपस्थित होते.

आमदार राजन साळवी यांनी ओणी येथील कोविड रूग्णालयासाठी आवश्यक ते सामान आले असून, ऑक्सिजन पाईपलाईन यंत्रणेचे काम प्रलंबित आहे़ ते पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी पुढील आठवडाभरात हे रूग्णालय सुरू करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.