शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

संगमेश्‍वर तालुक्यात कडकडीत लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:32 IST

देवरुख : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर संगमेश्‍वर तालुक्‍यामधून गुरुवारी लॉकडाऊनला ...

देवरुख : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर संगमेश्‍वर तालुक्‍यामधून गुरुवारी लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळाला. तालुक्‍यातील बाजारपेठांमध्ये महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने दिवसभर सर्वत्र शुकशुकाट हाेता.

साखरपा, माखजन, आरवली, संगमेश्‍वर या बाजारपेठांमध्येही कडक लॉकडाऊन पाळण्यात आले होते. साखरपा परिसरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पुन्हा बुधवारपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. गुरुवारी कोंडगाव-साखरपा बाजारपेठेतील बहुसंख्य व्यापाऱ्यांनी लस घेतली. तर काहींनी स्वत:हून आटीपीसीआर चाचणीही करून घेतली.

नेहमी गजबजलेला असणारा देवरुख एस. टी. स्टँडच्या परिसरात शुकशुकाट होता. लॉकडाऊनच्या भीतीने मंगळवार व बुधवारी संगमेश्वर बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी झाली होती. या गर्दीनंतर गुरुवारी नागरिकांनी लॉकडाऊनला एक प्रकारे पाठिंबा दिला. संगमेश्‍वर नाक्‍यामध्ये पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याबरोबरच साडवली सह्याद्रीनगर, मार्लेश्‍वर तिठा या ठिकाणी देवरुखचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त तैनात होता.

..............................

सह्याद्रीनगर येथे फिरणाऱ्या तिघांची चौकशी करण्यात आली. हे तिघे जण कामाशिवाय फिरत असल्याची खात्री होताच देवरुख पोलिसांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात नेऊन त्यांची आरटीपीसीआर चाचणी केल्याची माहिती पोलिसांनी दिली. देवरुखमध्ये गुरुवारी सगळे रिक्षा स्टँड रिकामे हाेते. एकही रिक्षा तालुक्‍यात फिरली नाही.

.............................

कॅप्शन : संगमेश्‍वर बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला हाेता.