रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे त्या त्या संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सद्यस्थितीचे भाडेदर विचारात घेऊन खासगी कंत्राटी परवाना वाहनाचे दर त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रतिकिलोमीटर भाडेदराच्या ५० टक्केपेक्षा अधिक राहणार नाही, असे कमाल भाडेदर शासनाने २७ एप्रिल २०१८ रोजी शासन निर्णय जारी करून निश्चित केले आहेत. या निर्धारित दरापेक्षा अधिक दर आकारल्यास वाहतूकदारांवर कडक कारवाई करावी, अशा सूचना राज्यातील सर्व उपप्रादेशिक कार्यालयांना देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे त्या त्या संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सद्यस्थितीचे भाडेदर विचारात घेऊन खासगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रतिकिलोमीटर भाडेदराच्या ५० टक्केपेक्षा अधिक भाडे राहणार नाही, असे कमाल भाडेदर शासनाने २७ एप्रिल २०१८ रोजी शासन निर्णय जारी करून निश्चित केले आहेत. त्यानुसारच प्रवाशांकडून भाडे आकारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच प्रवाशांना प्रवास करताना येणाऱ्या अडचणींबाबत mvdcomplaint.enf2@gmail.com या ई-मेल आयडीवर तक्रार नोंदवण्यात यावी. परिवहन आयुक्त यांनी परिवहन कार्यालयाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना राज्यात आगामी सुरू होणाऱ्या गर्दीच्या हंगामाच्या अनुषंगाने हे निर्देश दिले आहेत.
गर्दीच्या हंगामात खासगी बस मालकांकडून शासनाने निश्चित केलेल्या प्रतिकिलोमीटर भाडेदरापेक्षा अधिक भाडे आकारत नसल्याची वेळोवेळी खातरजमा करण्यात यावी. तसेच याप्रकरणी वेळोवेळी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी. खासगी वाहतूकदारांनी निर्धारित केलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारल्यास अशा वाहतूकदारांवर कडक कारवाई करण्यात यावी, असे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.