शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

प्रचारतोफा थंडावल्या

By admin | Updated: January 16, 2015 23:43 IST

लांजा नगरपंचायत : ‘चौरंगी लढती’, बंडोबांनी आणली रंगत

अनिल कासारे -लांजा  नगरपंचायतीत पहिल्यांदाच होत असलेल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रचाराच्या तोफा आज, शुक्रवारी थंड झाल्या. गेले महिनाभर सुरू असलेल्या आरोप- प्रत्यारोपांनी उडालेला धुरळा आज खाली बसला. आता राहिलेल्या २४ तासात गुप्त प्रचारास वेग येणार आहे. दरम्यान, आज प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शिवसेनेने लांजा शहरातील मुंबई - गोवा महामार्गावर प्रचार रॅली काढून, वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे.येथे राज्यातील भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रमुख पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. येथे सर्वच पक्षांना बंडखोरीचे ग्रहण लागले असून, बंडोबांनी प्रत्येक प्रभागात आव्हान निर्माण केले आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात उमेदवारांची गर्दी झाल्याने, शिवसेनेने, अनेक उमेदवारांना तिकिट न दिल्याने नाराजी व्यक्त करत सर्वाधिक मोठ्या प्रमाणात बंडखोरीची लागण शिवसेनेमध्ये झाली आहे. शिवसेनेच्या अधिकृत असणाऱ्या उमेदवारांना ही बंडखोरी डोकेदुखी ठरणार आहे. नगरपंचायतीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शिवसेनेने प्रचारासाठी सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर, मालवणचे आमदार वैभव नाईक, लांजा - राजापूरचे आमदार राजन साळवी, माजी आमदार गणपत कदम, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, रत्नागिरीचे आमदार उदय सामंत आदींना आज प्रचार रॅलीत उतरवून, वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेने प्रचार रॅली काढून, वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आदी मोठ्या पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व उमेदवारांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन, गाठीभेटी घेऊन आपल्या प्रचारावर भर दिला आहे. शिवसेनेने या निवडणुकीत दिग्गजांना उतरवून, निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. याचा किती परिणाम मतदारांवर होतो, हे मतमोजणीच्या दिवशी समजणार आहे. (प्रतिनिधी)एकूण १२ हजार ४०६ मतदार...नगरपंचायतीच्या एकूण १७ प्रभागात १२ हजार ४०६ मतदार असून, त्यामध्ये पुरुष ६ हजार २६२ व महिला ६ हजार १४४ आपल्या मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. प्रभाग १ मध्ये ५ उमेदवार रिंगणात असून, ३५३ मतदार आहेत. प्रभाग २ मध्ये ५ उमेदवार रिंगणात असून, ६८८ मतदार आहेत. प्रभाग ३ मध्ये ५ उमेदवार रिंगणात असून, ५२२ मतदार आहेत. प्रभाग ४ मध्ये ६ उमेदवार रिंगणात असून, १०४७ मतदार आहेत. प्रभाग ५ मध्ये ५ उमेदवार रिंगणात असून, ९२८ मतदार आहेत. प्रभाग ६ मध्ये ३ उमेदवार असून, ९१८ मतदार आहेत, प्रभाग ७ मध्ये ३ उमेदवार ७०२ मतदार आहेत. प्रभाग ८ मध्ये ४ उमेदवार ८६८ मतदार आहेत. प्रभाग ९ मध्ये ६ उमेदवार ९५८ मतदार आहेत. प्रभाग १० मध्ये ४ उमेदवार ७६२ मतदार आहेत. प्रभाग ११ मध्ये ४ उमेदवार ५०७ मतदार आहेत. प्रभाग १२ मध्ये ४ उमेदवार ७७१ मतदार आहेत. प्रभाग १३ मध्ये ७ उमेदवार ८८२ मतदार आहेत. प्रभाग १४ मध्ये ४ उमेदवार ६१९ मतदार आहेत. प्रभाग १५ मध्ये ३ उमेदवार ५८२ मतदार आहेत. प्रभाग १६ मध्ये ३ उमेदवार ७२२ मतदार, प्रभाग १७ मध्ये २ उमेदवार असून, ५७७ मतदार आहेत. एकूण १७ जागांसाठी ७३ उमेदवार रिंगणात असून, एकूण १२ हजार ४०६ मतदार आहेत.