शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कोकणातील पर्यटन वाढीसाठी राज्य शासनाचे नवे धोरण

By admin | Updated: January 5, 2016 00:20 IST

ग्रामीण पर्यटन विकास : ग्रामपंचायतींकडून जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवण्यास प्रारंभ

मुंबई : चीनमधील आर्थिक मंदीच्या बातम्या बाहेर आल्यामुळे शेअर बाजारांत घबराट पसरली असून, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५३७.५५ अंकांनी घसरून २६ हजार अंकांच्या खाली आला आहे. सेन्सेक्सची ही तीन महिन्यांतील सर्वात मोठी घसरण ठरली आहे. चीनमधील मंदीबरोबरच इतरही काही घटकांचा परिणाम बाजारावर झाल्याचे सूत्रांनी सांगितले. पश्चिम आशियातील राजकीय संकट आणि भारतातील वस्तू उत्पादन क्षेत्रातील घसरण यांचा त्यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे. भारताचे वस्तू उत्पादन क्षेत्र डिसेंबरमध्ये घसरून २८ महिन्यांच्या नीचांकावर गेले आहे. चीनचे कारखाना उत्पादन सलग पाचव्या महिन्यात घसरल्याचे एका खाजगी सर्वेक्षणात आढळून आले आहे. याशिवाय रुपयाच्या घसरणीचाही बाजारावर परिणाम झाला. आशियाई बाजार आज मोठ्या सुटीनंतर उघडले. त्यांना चीनमधील मंदीचा फटका बसला. शांघाय कंपोजिट सकाळी उघडताच तब्बल ७ टक्क्यांनी घसरला. त्यामुळे बाजारातील व्यवहार बंद करण्याची नामुष्की आली. ३0 कंपन्यांचा बीएसई सेन्सेक्स सकाळपासूनच नकारात्मक टापूत राहिला. सत्राच्या अखेरीस ५३७.५५ अंकांची अथवा २.0५ टक्क्यांची घसरण नोंदवून तो २५,६२३.३५ अंकांवर बंद झाला. २२ सप्टेंबरनंतरचा हा सर्वात कमजोर बंद राहिला आहे. गेल्या दोन सत्रांत सेन्सेक्सने २0१ अंकांची वाढ मिळविली होती. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १७१.९0 अंकांनी अथवा २.१६ टक्क्यांनी घसरून ७,७९१.३0 अंकांवर बंद झाला. १ सप्टेंबर रोजी निफ्टीने सर्वात मोठी एकदिवसीय घसरण नोंदविली होती. त्या दिवशी निफ्टी १८५.४५ अंकांनी घसरला होता.सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या ३0 पैकी २७ कंपन्यांचे समभाग घसरले. व्यापक बाजारांतही विक्रीचा दबाव राहिला. मिडकॅप १.२0 टक्क्याने, तर स्मॉल कॅप १.११ टक्क्याने घसरला. टाटाचा समभाग सर्वाधिक ६.१0 टक्क्यांनी घसरला. त्याखालोखाल भारती एअरटेल, अदाणी पोर्टस्, भेल, एचडीएफससी, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, एल अँड टी, लुपीन, गेल, अ‍ॅक्सिस बँक, सन फार्मा यांचे समभाग घसरले.