शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

श्री भैरीबुवाच्या शिमगोत्सवास आजपासून धडाक्यात प्रारंभ

By admin | Updated: March 11, 2017 21:20 IST

होलियो रेऽऽऽ होलिओ : भैरी जोगेश्वरी, नवलाई-पावणाई, तृणबिंदूकेश्वर ट्रस्टतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

रत्नागिरी : बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्री देव भैरी जोगेश्वरी, नवलाई पावणाई, तृणबिंदूकेश्वर ट्रस्टतर्फे शिमगोत्सवाला १२ मार्चपासून प्रारंभ होणार आहे. शिमगोत्सवामुळे आसपासच्या गावातील अनेक पालख्या श्री भैरी भेटीला येत आहेत. उत्सवामुळे मंदिराची रंगरंगोटी करून फुलांनी मंदिर सुशोभित करण्यात आले आहे.फाल्गुन पौर्णिमेला मध्यरात्री बारा वाजता श्री देव भैरीची पालखी श्री देवी जोगेश्वरी भेटीसाठी बाहेर पडणार आहे. खालचीआळी, महालक्ष्मी शेतातून मध्यरात्रीनंतर दीड वाजता जोगेश्वरीची होळी उभी करण्यासाठी पालखी जोगेश्वरी मंदिरात जाईल. दि. १३ रोजी पहाटे तीन वाजता श्री देवी जोगेश्वरी मंदिरातून पालखी ग्रामप्रदक्षिणेसाठी बाहेर पडेल. झाडगाव सहाणेवरून झाडगावनाका, टिळक आळी, काँग्रेस भवन, मुरलीधर मंदिर, बंदररोडमार्गे मांडवी भडंगनाका, मांडवी, घुडेवठार, विलणकरवाडी, चवंडेवठार, खडपे वठार, तेलीआळी, रामनाका, राम मंदिर, राधाकृष्णनाका, गोखलेनाका, विठ्ठल मंदिरकडून होळी घेण्यासाठी जाईल. होळीचा शेंडा घेऊन दुपारी झाडगाव येथे सहाणेवर जाऊन होळी उभारण्यात येईल.दि. १३ रोजी रात्री ९ वाजता धुळवड साजरी करण्यासाठी निशाण निघणार आहे. निशाण झाडगावात फिरून, श्री देवी जोगेश्वरी मंदिरात जाईल, तेथून सहाणेच्या मागील बाजूने झाडगावकर कंपाऊंड, कुंभारवाडा, परटवणे, फगरवठार, वरचीआळी, लक्ष्मीचौक, गोखले नाक्यातून ढमालणीच्या पारावर येईल. रात्री ११.३० वाजता पारावरून निशाणाचे तीन भाग करण्यात येणार आहेत. एक निशाण घेऊन गुरव मंडळी भैरी मंदिरात, दुसरा भाग गोखलेनाका, राधाकृष्णनाका, मच्छीमार्केट येथे जाईल. पुन्हा फिरून झारणी रोड, राम नाका, तेलीआळी, रसाळ यांच्या तिठ्यावर येईल.ढमालणीच्या पारावरून तिसरा भाग पऱ्याचीआळी, मारूतीआळी, तेलीआळीतून रसाळ यांच्या तिठ्यावर येईल. गोडीबाव नाका, खडपेवठार व तेथून निशाण राजिवड्यातील श्री काशीविश्वेश्वर मंदिरात येईल. त्यानंतर धुळवड साजरी होणार आहे. तेथून निशाण खडपेवठार, चवंडेवठार, विलणकर वाडी, श्री दत्तमंदिर नाका, घुडेवठार मांडवी येथील वारंग यांच्या घरी थांबेल.दि. १४ रोजी चौगुलेवाडी, कुरणवाडी, पेठकिल्ला राम मंदिर, सांब मंदिर, जोतिबा मंदिर येथे धुळवडीचे दोन भाग होऊन एक भाग राम मंदिराच्या मागील बाजूने जाऊन दुसरा भाग राम मंदिराच्या पुढील बाजूने मिरकरवाडा पोलीस चौकीजवळ धुळवडीचे दोन भाग एकत्र येतील. पुढे भैरी मंदिर, खालची आळी, दांडा फिशरीज जवळून मुरूगवाडा विठ्ठलादेवी, पंधरामाड, मुरूगवाडा हद्दीजवळ जाऊन गाऱ्हाणे होऊन धुळवड परत मागे फिरून झाडगाव सहाणेजवळील झाडगावकर यांच्या आवारात आल्यानंतर धुळवडीचा कार्यक्रम संपेल.दि. १५ ते १७ मार्चपर्यंत दुपारी एक वाजेपर्यंत श्री देव भैरीची पालखी झाडगाव सहाणेवर भाविकांच्या दर्शनासाठी थांबणार आहे. दि. १४ ते १६ मार्च रोजी रात्री १० नंतर प्रत्येक वाडीतर्फे पारंपरिक पद्धतीत पालखी नाचविण्यात येणार आहे.दि. १६ रोजी भैरीची पालखी मुरूगवाड्यात ग्रामप्रदक्षिणा करणार आहे. झाडगावमार्गे जोगेश्वरी मंदिर, खालचीआळी, भैरी मंदिरमार्गे दांडा फॅक्टरी, पंधरा माडपर्यंत जाऊन परत सहाणेवर येईल. त्यानंतर पालखी नाचविण्याचा कार्यक्रम होईल. दि. १७ रोजी श्री भैरीची पालखी रंग खेळण्यासाठी सहाणेवरून निघेल. पोलीस कर्मचाऱ्यांची शस्त्रसलामी घेऊन जोगेश्वरी मंदिरातून गाडीतळ , नवलाई-पावणाई मंदिर, शहर पोलीस ठाणे, धनजीनाका, राधाकृष्णनाका, रामनाका, राम मंदिर, मारुतीआळी, गोखलेनाका, ढमालणीचा पार, विठ्ठल मंदिर, काँग्रेस भवन, मुरलीधर मंदिर, खालचीआळीमार्गे भैरी मंदिराच्या प्रांगणात ११.३० वाजता नेण्यात येईल. (प्रतिनिधी)रात्री बारा वाजता पालखी स्थानापन्न होऊन धुपारत, गावाचे गाऱ्हाणे होऊन शिमगोत्सवाची सांगता होणार आहे. या शिमगोत्सवानिमित्ताने रत्नागिरी शहर सजले आहे. ज्या ज्या ठिकाणी भैरीची पालखी जाणार आहे, त्याठिकाणी मंडप उभारण्यात आला आहे. तसेच रस्त्यांवर रांगोळ्याही काढण्यात येणार आहे. पाहुण्यांच्या स्वागतासारखीच या ग्रामदेवतेच्या स्वागताची तयारी सध्या रत्नागिरी शहरात सुरु आहे.सडामिऱ्या व जाकीमिऱ्या येथील नवलाई-पावणाई-म्हसोबा या पालख्यांची भैरी मंदिराच्या प्रांगणात होळी पौर्णिमेला भेट होते.