शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

भैरीबुवाच्या शिमगोत्सवास २३पासून प्रारंभ

By admin | Updated: March 16, 2016 08:29 IST

रत्नागिरीचे ग्रामदैवत : मानकरी, गावकऱ्यांच्या उपस्थितीत उत्सवाची रूपरेषा तयार...

रत्नागिरी : येथील बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्री देव भैरी देवस्थानचा शिमगोत्सव २३पासून साजरा करण्यात येणार आहे. देवस्थानचे ट्रस्टी, मानकरी, गावकरी, गुरव यांच्या सहकार्याने शिमगोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे.फाल्गुन पौर्णिमेला दिनांक २३ रोजी रात्री १० वाजता श्री देवी जोगेश्वरी मंदिरातून श्री देव भैरीला उत्सवाचे निमंत्रण देण्यासाठी सर्व मंडळी पारंपरिक पद्धतीने झाडगाव सहाणेवरून महालक्ष्मी शेतातून भैरी मंदिरात जाणार आहेत. मध्यरात्री १२ वाजता श्री देव भैरीची पालखी श्री देवी जोगेश्वरीच्या भेटीसाठी बाहेर पडेल. मध्यरात्री १.३० वाजता जोगेश्वरी मंदिरात पोहोचणार आहे. दिनांक २४ रोजी श्री देवी जोगेश्वरी मंदिरात मुरुगवाड्यातील मंडळी आल्यानंतर पहाटे ३ वाजता मंदिरातून पालखी ग्रामप्रदक्षिणा व होळीचा शेंडा उभा करण्यासाठी बाहेर पडेल. झाडगाव नाका, टिळक आळी, काँग्रेस भुवन, मुरलीधर मंदिर, बंदररोडमार्गे पहाटे ५ वाजता मांडवी, भडंग नाका येथे जाईल. तेथून मांडवी घुडेवठार, विलणकरवाडी, चवंडेवठार, खडपेवठार मागील समुद्रमार्गाने जाऊन पुढे शेट्ये यांच्या घराजवळ रस्त्यावर येऊन गोडीबाव तळ्यावर सकाळी १० वाजता येईल. त्यानंतर तेलीआळी येथून रामनाका, राममंदिर, राधाकृ ष्ण नाका, गोखले नाका, विठ्ठल मंदिर, काँग्रेस भुवन येथे होळी घेण्यासाठी येर्ईल. कुष्टे कंपाऊंड येथे होळी घेऊन दुपारी ३ वाजता झाडगाव येथे सहाणेवर येऊन होळी उभी करण्यात येईल.दिनांक २४ रोजी रात्री ९ वाजता धुळवडीला प्रारंभ होईल. परंपरेने धुळवड मार्गस्थ होत दिनांक २५ रोजी झाडगाव सहाणेजवळील झाडगावकर कंपाऊंडमध्ये दुपारी १२ वाजता येईल. दिनांक २४ ते २८ पर्यंत दुपारी १ वाजेपर्यंत श्री भैरीची पालखी झाडगाव सहाणेवर दर्शनासाठी स्थानापन्न राहणार आहे. दिनांक २५ ते २७ रोजी दररोज रात्री १० वाजल्यानंतर प्रत्येक वाडीतर्फे पालखी नाचवण्याचा कार्यक्रम होणार आहे. २७ रोजी दुपारी १.३० वाजता पालखी मुरुगवाड्यात ग्रामप्रदक्षिणेसाठी जाणार आहे. झाडगाव जोगेश्वरी मंदिर, खालची आळी भैरी मंदिरमार्गे मुरुगवाड्यातून पंधरा माडापर्यंत जाऊन परत मागे फिरणार आहे. रात्री ८.३० वाजता पुन्हा सहाणेवर झाडगावात येईल. २८ रोजी रंगपंचमी खेळण्यासाठी पालखी दुपारी १ वाजता सहाणेवरून उठेल. पोलिसांची शस्त्र सलामी घेऊन झाडगाव श्री देवी जोगेश्वरी मंदिरातून गाडीतळ येथे ३.३० वाजता येईल. नवलाई पावणाई मंदिरात सायंकाळी ४.३० वाजता पोहोचेल. तेथून शहर पोलीस स्टेशन धनजीनाक्यावरून राधाकृ ष्ण नाका, रामनाका, राममंदिर, मारुती आळी, गोखले नाका, ढमालणीचा पार, विठ्ठल मंदिर, काँगे्रस भुवन, मुरलीधर मंदीर, श्री देव भैरी मंदिराच्या प्रांगणात रात्री ११.३० वाजेपर्यंत येईल. रात्री १२ वाजता पालखी मंदिरात स्थानापन्न होईल. धुपारत व बारा वाड्यांचे गाऱ्हाणे झाल्यानंतर शिमगोत्सवाची सांगता होणार आहे. (प्रतिनिधी)