शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

खेर्डीत लसीकरण उपकेंद्र सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:30 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : शहरालगतच्या खेर्डी गावची लोकसंख्या २० हजारांच्या घरात पोहोचली आहे. खेर्डीचे लोक अडरे येथे ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : शहरालगतच्या खेर्डी गावची लोकसंख्या २० हजारांच्या घरात पोहोचली आहे. खेर्डीचे लोक अडरे येथे जातात. अडरे प्राथमिक आरोग्य केंद्रात मागणीप्रमाणे लसीकरण होत नाही. त्यामुळे खेर्डीमध्ये लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या दिशा दाभोळकर, पंचायत समिती सदस्य नितीन ठसाळे यांनी आमदार शेखर निकम यांच्याकडे पत्राद्वारे केली. त्यानुसार आमदारांनी तत्काळ जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला. सोमवारपर्यंत याविषयीचा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

खेर्डी हे चिपळूण शहराच्या लगतचे मोठे गाव. एक पंचायत समिती गण म्हणजे खेर्डी गाव आहे. हे गाव प्राथमिक आरोग्य केंद्रात मोडते; परंतु गावाची लोकसंख्या पाहता अडरे प्राथमिक आरोग्य केंद्रात मागणीप्रमाणे लसीकरण होत नाही. त्यामुळे खेर्डीमध्ये लसीकरण केंद्र सुरू होण्यासाठी जिल्हा परिषद सदस्या दिशा दाभोळकर, पंचायत समिती सदस्य नितीन ठसाळे, माजी सरपंच दशरथ दाभोळकर यांनी पुढाकार घेतला आहे. खेर्डी गावात औद्योगिक वसाहत असल्यामुळे बाहेरील कामगारांची ये - जा मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे कोरोना प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. खेर्डीत लसीकरण उपकेंद्र होणे अत्यंत आवश्यक आहे. मुळात खेर्डीची लोकसंख्या पाहता आरोग्य विभागाकडून यापूर्वीच खेर्डीत लसीकरणाची सुविधा निर्माण करण्याची आवश्यकता आहे. खेर्डीच्या लोकांना अडरेत जावे लागत असल्याने काहीसे संतापाचे वातावरण आहे. खेर्डीत लसीकरणासाठी आवश्यक त्या सुविधा आहेत. तिथे ग्रामस्थांचे हाल होणार नाहीत. त्यामुळे खेर्डीत लसीकरणाची सुविधा करण्याची मागणी आमदार निकम यांच्याकडे केली.

यावर आमदार निकम यांनी तत्काळ जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. कोणत्याही स्थितीत दोन दिवसांत खेर्डी येथे लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी त्यांनी सूचना केली. यावर दोन दिवसांत निर्णय होईल, असे आश्‍वासन जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले. आमदार निकम यांच्यासह तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या दिशा दाभोळकर, पंचायत समिती सदस्य नितीन ठसाळे, माजी सरपंच दशरथ दाभोळकर, ग्रामपंचायत सदस्य रियाज खेरटकर, राजेश सुतार, राकेश दाभोळकर, प्रणाली दाभोलकर, राशिदा चौगुले, प्रशांत दाभोळकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.