शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ST Strike : ..तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार, एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2021 12:19 IST

रत्नागिरी : एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण व्हावे यामागणीसाठी गेल्या काही दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू आहे. यावर अद्याप तोडगा निघाला ...

रत्नागिरी : एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण व्हावे यामागणीसाठी गेल्या काही दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू आहे. यावर अद्याप तोडगा निघाला नाही. माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, भाजप आ. गोपीचंद पडळकर व कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने  काल, शनिवारी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा केली. मात्र चर्चेच्या केवळ फेऱ्या सुरू असून यावर तोडगा निघालेला नाही. परिणामी एसटी सेवा अजून देखील बंदच आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. तर, दुसरीकडे खासगी वाहतूक तेजीत सुरु आहे.

दरम्यान, रत्नागिरी येथील आंदोलनात सहभागी असलेल्या कर्मचार्‍यांनी आज, रविवारी सकाळी जोपर्यंत एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे. कर्मचाऱ्यांनी शपथ घेऊन कामबंद आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचेही यावेळी स्पष्ट केले.

तर, सरकारकडून आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र कर्मचारी आपल्या मागण्यावर ठाम आहेत. दरम्यान शासनाने आंदोलनकर्त्यां कर्मचाऱ्यांवर राज्यात अनेक ठिकाणी निलंबनाची कारवाई देखली केली आहे. तरी देखील एसटी कर्मचारी आपल्या मागण्यावर ठाम आहेत. यातच काल, शनिवारी कोल्हापुरातील एका एसटी कर्मचाऱ्याचा निलंबनाच्या कारवाईच्या भितीने ह्दयविकाराच्या धक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या या मागण्यावर कधी तोडगा काढणार हे पाहावे लागणार आहे.  

टॅग्स :ST Strikeएसटी संप