शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खर्च लाखोंचा; थेंब नाही पाण्याचा

By admin | Updated: August 7, 2014 00:13 IST

जैतापूर आरोग्यकेंद्र : कोणालाच सोयरसुतक नाही

जैतापूर : पाण्याचा विषय काढला की, डोळ्यातून पाणी येईल. पण, नळपाणी योजनेतून काही येणार नाही, असे सध्या ग्रामीण भागात म्हटले जात आहे. याची तंतोतंत प्रचिती जैतापूरमध्ये येत आहे. सुमारे १९ लाख रुपये खर्च करुन जिल्हा परिषदेने प्राथमिक आरोग्य केंद्र, जैतापूरला पाणीपुरवठा योजना राबवली. मात्र, या योजनेचे थेंबभर पाणी गेल्या आठ वर्षांत आरोग्य केंद्राला न मिळाल्याने कर्मचारी व रुग्णांची पाण्यासाठी वणवण संपलेली नाही.जैतापूर आरोग्य केंद्र (ता. राजापूर) हे परिसरातील सामान्य रुग्णांवरील प्राथमिक उपचारासाठी मोठे आशास्थान आहे. मात्र, येथे रुग्णाला नेल्यास त्याचा उपचाराअभावी नाही तर पाण्याअभावी मृत्यू ओढवू शकतो. कारण १९ लाख रूपये खर्च झाले तरी पाण्याचं स्वप्न काही सत्यात उतरलेलं नाही.जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा तत्कालीन उपाध्यक्ष विलास अवसरे, दळेचे त्यावेळचे उपसरपंच महेश करगुटकर, तत्कालीन वैद्यकीय अधिकारी महेंद्र गावडे यांच्या उपस्थितीत होळी गावात एकनाथ राजू गुरव यांच्या जमिनीत योजनेसाठीच्या विहिरीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. माजी उपसरपंच महेश करगुटकर नवीन कार्यकारिणीत सरपंचपदी विराजमान झाले. त्यांचा कार्यकाळ संपत आला तरी ही योजना ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रातील पाणी समस्या संपलेली नाही.हे आरोग्य केंद्र ग्रामपंचायत, दळेच्या कार्यक्षेत्रात येते. एकनाथ गुरव यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी यांच्या नावे बक्षीसपत्राने विहिरीसाठी जमीन विनामोबदला दिली आहे. १९ लाखाची ही नळपाणी योजना असताना मक्तेदाराने दळे नळपाणी योजनेच्या चरातच पाईपलाईन टाकले. काही लाईन सहा इंच खोलीच्या कातळावर चर मारुन टाकली व पैसे वाचवले. विहीर बांधून तयार आहे. विजेचा खांब विहिरीजवळ आहे. तरीही विहिरीवर पंप बसलेला नाही. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे एवढा पैसा ओतूनही पाणी न आल्याचे कोणालाच सोयरसुतक नाही. त्यामुळे हे १९ लाख रुपये नेमके जिरले कुठे? असा संतप्त प्रश्न विचारला जात आहे. (वार्ताहर)आरोग्य केंद्राबाबत सामान्यांचे राहोच, पण लोकप्रतिनिधीही किती उदासिन आहेत, हेच या घटनेवरून दिसून येते. आरोग्य केंद्रासाठी १९ लाखांचा निधी खर्चूनही पाण्याचा एक थेंब येत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. आमदारांपासून ते जिल्हा परिषद सदस्यांपर्यंत कोणालाच या आरोग्य केंद्राकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याने रुग्णांबरोबरच स्थानिक ग्रामस्थांमध्येही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.-अजूनही पाण्याची समस्या कायमच.-विहीर बांधून पूर्ण, विजेचे खांबही तयार. मात्र विहीरीवर पंपच बसवलेला नाही.-दळे येथील एकनाथ गुरव यांनी विहीरीसाठी दिली विनामोबदला जागा.-पाण्यासाठी करावी लागतेय -मक्तेदाराने पैसे वाचवण्यासाठी दळे नळपाणी योजनेच्या चरातच पाईपलाईन टाकली.