शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

गौणखनिज उत्खनन बंदीबाबत विशेष निवेदन

By admin | Updated: November 28, 2014 23:48 IST

मुख्यमंत्र्यांची भेट : प्रमोद जठार यांनी मांडल्या विविध समस्या

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गौणखनिज उत्खनन बंदी तसेच विविध प्रश्नांबाबत माजी आमदार प्रमोद जठार यांनी शिष्टमंडळासह मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन लेखी निवेदन दिले. या प्रश्नांबाबत तातडीने निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या शिष्टमंडळाला दिले.भाजपाच्या शिष्टमंडळात माजी आमदार प्रमोद जठार यांच्यासह प्रवक्ते माधव भंडारी, माजी आमदार राजन तेली आदींचा समावेश होता. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात लागू असलेल्या गौणखनिज बंदीमुळे त्यावर अवलंबून असलेल्या स्थानिकांसमोर मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांमुळे केंद्र शासनाच्यावतीने सावंतवाडी, दोडामार्ग कॉरीडॉर वगळता रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात लागू करण्यात आलेली गौणखनिज बंदी उठविण्यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र तातडीने उच्च न्यायालयात सादर करण्याबाबत पाठपुरावा करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.देवगड तालुक्यातील तारामुंबरी-मिठमुंबरी येथील खाडीवर मोठा पूल बांधण्याचे काम गेले अनेक वर्षे प्रलंबित आहे. हा पूल बांधण्यासाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या संपादनाकरिता निधी उपलब्ध करून द्यावा. देवगड-जामसंडे प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना नादुरूस्त असल्याने जनतेची गैरसोय होत आहे. यापूर्वी शासनाकडे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत निधी मिळण्याकरिता प्रस्ताव सादर केलेला होता. मात्र देवगड नगरपंचायत स्थापन करण्याची उद्घोषणा झाल्यामुळे नागरी क्षेत्रासाठी किंवा नगरपंचायत क्षेत्र घोषित झालेल्या क्षेत्रासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत पाणी पुरवठा योजनांना मंजुरी देण्यात येत नाही, असे शासनाकडून कळविण्यात आले आहे. देवगड नगरपंचायत कधी अस्तित्वात येईल हे निश्चित नसल्याने खास बाब म्हणून पाणीपुरवठा योजनेचा राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत समावेश करून निधी देण्यात यावा.पर्ससीन व पारंपरिक मासेमारी करणाऱ्या व्यावसायिकांच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने कार्यवाही करून संबंधित अहवाल व अ‍ॅक्शन टेकन रिपोर्ट जनतेच्या माहितीसाठी जाहीर करावा. जिल्ह्यातील साकव दुरूस्तीसाठी लेखाशिर्ष निर्माण करून निधीची तरतूद करावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.फडणवीस यांनी मागण्यांबाबत विभाग प्रमुखांना फाईल कार्यालयाकडे पाठविण्याचे आदेश दिले आहेत. (वार्ताहर)