शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

स्थानकाच्या आवारातच दारूच्या बाटल्यांचा ढिग

By admin | Updated: April 17, 2017 18:30 IST

भाजपच्या खेड शहरातील स्वच्छता अभियान मोहिमेला प्रारंभ

आॅनलाईन लोकमतखेड : भारतीय जनता पक्षाच्यावतीने खेड शहरातील प्रमुख ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. याअंतर्गत बसस्थानकात राबविलेल्या स्वच्छता अभियानादरम्यान काही ठिकाणी दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्थानकप्रमुखांनाच याबाबत जाब विचारला. आगारातील अस्वच्छतेचा पाढाच यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी वाचला. शहरातील स्वच्छता अभियान मोहिमेला भाजप कार्यकर्त्यांनी शुक्रवारपासून प्रारंभ केला. यावेळी बसस्थानकाबरोबरच कार्यकर्त्यांनी पालिकेच्या जिजामाता उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यानजीकचा परिसर स्वच्छ केला. हा परिसर स्वच्छ करताना ठिकठिकाणी दारूच्या बाटल्या आणि फाटके कपडे आढळून आले. बसस्थानकातील अस्वच्छतेमुळे येथील कंत्राटदाराबाबतच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. भाजपचे प्रभारी शशिकांत चव्हाण यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह या अस्वच्छतेबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी खेड पोलीस ठाणे गाठून या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत लाड यांनी याबाबत कडक उपाययोजना करण्यात येतील, असे सांगितले. या मोहिमेत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजू रेडीज, शशिकांत चव्हाण, तालुकाध्यक्ष विनोद चाळके, सरचिटणीस आंब्रे, नागेश धाडवे, उदय बोरकर, चंद्रकांत सुतार, संजय बुटाला, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष राकेश पाटील, संतोष दोडेकर, संजिवनी शेलार यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)