शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
5
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
6
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
7
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
8
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
9
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
10
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
11
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
12
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
13
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
14
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
15
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
16
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
17
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
18
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
19
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
20
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा

नाटेत घुमला ‘अणुऊर्जा हटाव’चा आवाज

By admin | Updated: October 2, 2016 23:40 IST

दोन दिवसांच्या आंदोलनाला सुरुवात : राजन साळवी यांच्यासह वैशाली पाटील, ग्रामस्थांचा सहभाग

 राजापूर : ‘नको अणुऊर्जा’, ‘अणुऊर्जा हटाव- कोकण बचाव’ अशा गगनभेदी डरकाळ्या फोडीत नाटेमधील सोनारगडगा येथील धरणे आंदोलनाला जबरदस्त प्रतिसाद लाभला. आमदार राजन साळवी यांच्यासह पर्यावरण नेत्या वैशाली पाटील व अन्य मान्यवर या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. कोणत्याही परिस्थितीत कोकणचे नुकसान करणारा विषारी प्रकल्प येथून हद्दपार झालाच पाहिजे, अशी मागणी यावेळी उपस्थित मान्यवरांनी केली. देशातील सर्वाधिक मोठ्या क्षमतेचा म्हणजेच दहा हजार मेगावॅट एवढी अणुऊर्जा निर्मिती करणारा प्रकल्प जैतापूर परिसरात येऊ घातला असून, हा प्रकल्प विनाशकारी आहे. त्याचा विपरीत परिणाम पर्यावरणासह मानवी जीवन व मच्छिमारी, बागायती, भातशेती यावर होईल, या भीतीने स्थानिक जनता प्राणपणाने संघर्ष करीत आहे. त्यानुसार दोन दिवसांचे धरणे व उपोषण आंदोलन जनहक्क समिती व शिवसेना यांच्यावतीने आयोजित करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी रविवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जन्मदिनी समस्त आंदोलक नाटेमधील शहीद तबरेज सायेकर चौकात जमा झाले. त्याठिकाणी दिवंगत तबरेजच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यावेळी आमदार राजन साळवी, मच्छिमार नेते अमजद बोरकर, पर्यावरण नेत्या वैशाली पाटील, जिल्हा परिषद सदस्य अजित नारकर, जनहक्क समितीचे अध्यक्ष सत्यजित चव्हाण, सचिव दीपक नागले, विभागप्रमुख राजा काजवे, मज्जीद गोवळकर, मंगेश चव्हाण उपस्थित होते. त्यानंतर सर्वजण सोनार गडग्याकडे आंदोलनस्थळी निघाले. या प्रकल्प परिसरातील प्रकल्पाची संरक्षक भिंत व नाटे पोलिस ठाणे या एक किलोमीटर परिसरात मनाई आदेश लागू करण्यात आला असून, १४४ कलम जिल्हा प्रशासनाने लागू केले आहे. केवळ सोनारगडगा याच ठिकाणी धरणे आंदोलनाला परवानगी मिळाली होती. त्यानुसार तेथे सर्वजण जमले, त्यावेळी या घातक प्रकल्पाविरुद्ध घोषणा दिल्या जात होत्या. काळे झेंडे दाखविले जात होते, तर आंदोलक संतप्तपणे प्रकल्पाविरोधात घोषणा देत होते. त्यावेळी गगनभेदी घोषणांनी आसमंत दुमदुमुन गेला होता. आंदोलनातील महिलादेखील जोरदार घोषणा देत होत्या. (प्रतिनिधी) खासदार आज येणार यानंतर आज, सोमवारी खासदार विनायक राऊत व आमदार राजन साळवी यांच्या उपस्थितीत धरणे आंदोलन होणार असून, त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.