शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
5
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
6
Operation Sindoor Live Updates: भारताचा कोणताही शत्रू वाचू शकत नाही, अमित शाहांची पोस्ट
7
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
8
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
9
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
11
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
12
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
13
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
14
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
15
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
16
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
17
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
18
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
19
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
20
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?

गावोगावचे गुंतागुंतीचे प्रश्न सोडविणार : माने

By admin | Updated: July 23, 2016 23:50 IST

पुनर्वसन मंत्र्यांची भेट घेणार : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पग्रस्तांची बैठक

रत्नागिरी : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला मिळण्यासाठी आणि पुनर्वसनासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ, प्रत्येक गावात सभा घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधून समस्या जाणून घेऊ, कोंडी फोडण्यासाठी आपण रत्नागिरीत आलात ही ऐतिहासिक गोष्ट आहे. दशक्रोशीतील कोणावरही अन्याय होऊ नये यासाठी आम्ही पक्षविरहित काम करू. तसेच प्रकल्पबाधितांना भाजप सरकार आईच्या मायेने प्रेम देईल, असे आश्वासन भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी दिले.विसूभाऊ पटवर्धन व प्रकल्पग्रस्तांनी एकत्र येऊन दत्तमंगल कार्यालयात सभा घेतली. त्यावेळी माने बोलत होते. व्यासपीठावर विसूभाऊ पटवर्धन, दिवाकर आडविरकर आणि केंद्रीय रेल्वे समितीचे सदस्य मनोहर गोठणकर उपस्थित होते.बाळ माने यांनी केंद्र व राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर आमचीही भूमिका व नैतिक जबाबदारी वाढली असून, मी प्रकल्पाबाबतचे आपले दु:ख समजू शकतो. मी प्रकल्पाचा एजंट नाही. पक्षविरहीत काम झाले पाहिजे. भाजपमध्ये प्रवेश करा, मग काम करतो अशी माझी वृत्ती नाही. पक्षामुळे तुमच्यामध्येच वादंग होऊ नयेत. सर्व समस्या जाणून घेतल्यानंतरच आपण एकत्र काम करू, असे बाळ माने म्हणाले.पक्षविहरित कामावर भर देऊ. प्रकल्पाबाबत अनेक गुंतागुंतीचे प्रश्न आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल प्रशासन, पुनर्वसन यांच्याकडूनही पूर्ण माहिती घेतली पाहिजे. नुकसानभरपाई वाढली पाहिजे, पाच किलोमीटर परिसरातील गावे बाधित घोषित करावी, याकरिता पुनर्वसन मंत्र्यांची भेट घेऊ, असे माने यांनी सांगितले.विसूभाऊंनी ग्रामस्थांमधील संभ्रमावस्था मांडली. मोबदला घेतला म्हणजे प्रकल्पाला पाठिंंबा नव्हे अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. शासनाने ग्रामस्थांची बाजू मांडून प्रकल्पाशी नवा करार करावा. महामार्ग किंवा विमानतळासाठी लाखो रूपयांची भरपाई दिली जाते. या भरपाईच्या बाबतीत कोकणाला वेगळा न्याय का? असा सवालही त्यांनी यावेळी केला. यावेळी राजन लाड, माडबनच्या माजी सरपंच मंदा वाडेकर, आदींसह काही ग्रामस्थांनी व्यथा मांडल्या.अध्यक्षीय भाषणात दिवाकर आडविरकर यांनी सांगितले की, १९७५च्या सुमारास दिल्ली विश्वविद्यालयातील ४० युवक अणुऊर्जा प्रकल्पाच्या परिणामांचे सर्वेक्षण करण्यासाठी जैतापूरला आले होते. या सभेला मिठगवाणे, जैतापूर, जानशी, बाकाळे, सागवे, माडबन आदी दहा गावांतील दीडशे ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)