रत्नागिरी : वालरस या समुद्र प्राण्याच्या सुळ्यांची तस्करी करणाऱ्या तीन संशयितांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. वन विभागाकडून त्यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. त्यांच्या अन्य साथीदारांचा वन विभागाकडून शाेध सुरू आहे.
मुंबई-गाेवा महामार्गावरील हातखंबा येथे ३१ ऑगस्ट राेजी रात्री ९.३० ही कारवाई करण्यात आली.
मंगळवार ३१ ऑगस्ट रात्री ९.३० वाजता हातखंबा येथे करण्यात आली. वन विभाग व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांनी संयुक्तरित्या सापळा रचून ही कारवाई केली. या कारवाईत मुहंमद नुमान यासिन नाईक (४१, रा. कोनाडी, कोरगाव, उत्तर गोवा), हेमंत सुरेश कांडर (३८, कणकणवली, सिंधुदुर्ग) आणि राजन दयाळ पांगे (५८, रा. पारवाडी आचरे मालवण, सिंधुदुर्ग) यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास वन विभाग करीत आहे.