शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

एसएमएस फंडा अनेकांना गंडा

By admin | Updated: August 27, 2014 23:13 IST

चिपळुणातील प्रकार : महिलांचीही फसवणूक

चिपळूण : तुम्हाला २५ लाख रुपयांचे बक्षीस लागले आहे, त्यासाठी १५ हजार रुपये भरा, असा एसएमएस येण्याचा प्रकार चिपळूणमध्ये सुरु आहे. मोबाईलद्वारे काही महिलांची फसवणूक झाली असल्याची चर्चा असून, अशा घटनांपासून नागरिकांनी सावध राहायला हवे, असे आवाहन माजी नगरसेविका सीमा चाळके यांनी केले आहे. सध्या मोबाईलचे युग असल्याने तरुण-तरुणींसह अनेकांच्या हातात सध्या मोबाईल पाहायला मिळतो. बँकेतील खातीही इंटरनेटशी जोडली गेली असल्याने खाते क्रमांक सांगून ग्राहकांना लुटण्याच्या घटना घडत आहेत. याचा अनुभव प्रत्यक्ष माजी नगरसेवक चाळके यांना आल्याचे त्यांनी सांगितले. तामिळनाडू येथून एक आपल्याला मोबाईलवरुन एसएमएस आला. आपल्याला २५ लाखांचे बक्षीस लागले आहे. त्यासाठी दिलेल्या खाते क्रमांकावर १५ हजार रुपये भरा, अशी सूचना करुन ३ तासाने तुमची भरलेली रक्कम परत मिळेल, असे आमिष दाखविले जात आहे. गोवळकोटसारख्या भागातही अशा प्रकारे ३ ते ४ महिलांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. तामिळनाडू येथील एका टोळीकडून नागरिकांना आपल्या बँकेचा अकाऊंट नंबर सांगा. आम्ही बँकेतून बोलत आहोत, असे सांगून बँक खात्यातील पैसे परस्पर गायब होण्याच्या प्रकारात वाढ होत असल्याने याबाबत चाळके यांनी पोलीस यंत्रणेकडेही संबंधित व्यक्तीचा मोबाईल नंबर दिला आहे, असे चाळके यांनी सांगितले.आपल्याला मोठे बक्षिस लागले आहे, असे आमिष दाखवून फसवणुकीचा प्रकार होण्याची शक्यता असल्याने यापासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहनही चाळके यांनी केले आहे. (वार्ताहर)