रत्नागिरी : मरणानंतर शांत चित्ताने चिरनिद्रा मिळावी, यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च करून जिल्ह्यात १४९३ स्मशान शेड उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हा परिषदेकडून जिल्हा नियोजन मंडळाला लवकरच प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. जन्मापासून मरणापर्यंत जनतेला सोयीसुविधा देण्याचे धोरण शासनाने आखले आहे. मुलांचा जन्म होण्याआधीच गरोदर महिलांना योग्य आहार, तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी शासनाकडून घेण्यात येते. त्यानंतर शिक्षणापासून आता अन्नधान्याची सोय तर केली आहेच. शिवाय मोफत औषधोपचार करण्यासाठी जीवनदायी योजना सुरु केली. त्यातून हजारो लोकांना मरणातून वाचवण्यासाठी कॅन्सर, हृदय विकारावरही उपचार करण्यात येत आहेत. विकासाबरोबरच जनतेला सर्वच सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे धोरण शासनाकडून राबविले जात आहे. शासनाचे विकासाचे धोरण माणसाच्या अंतिम यात्रेपर्यंत म्हणजेच स्मशानभूमीपर्यंत जाऊन पोहोचले आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून जनसुविधाअंतर्गत स्मशान शेड उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हाभरातून प्रस्ताव मागवण्यात आले होते. जिल्ह्याच्या सर्वच ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन आपल्या हद्दीतील स्मशानभूमींसाठी आवश्यक असलेली स्मशानशेडचे जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडे पाठवण्यात आले होते. ग्रामपंचायत विभागाने जिल्ह्यातील १४९३ स्मशानशेडचा आराखडा तयार केला होता. त्यानंतर तो प्रस्ताव जिल्हा नियोजन मंडळाकडे पाठवण्यात येणार आहेत. जनसुविधाअंतर्गत स्मशान शेड बांधकामासाठी १ लाख ९२ हजार रुपये देण्यात येत होते. वाढत्या महागाईसह शासनानेही विचार करून त्यामध्ये वाढ करण्यात आली असून आता २ लाख ५२ हजार रुपये अनुदान दिले जात आहे. त्यामुळे शेडची कामे लवकरच होेणार आहेत. त्यासाठी ३ कोटी ७ लाख ९२ हजार २२ रुपयांचा निधी लागणार आहे. (शहर वार्ताहर) विकास धोरण : नियोजन मंडळाचे प्रयत्न तालुकानिहाय संख्या तालुका प्रस्तावित स्मशानशेड मंडणगड ३९ दापोली १७० खेड १११ चिपळूण ५०० गुहागर ५० संगमेश्वर २२३ रत्नागिरी १९९ लांजा ४४ राजापूर १५७ एकूण १४९३ ४नियोजन मंडळाकडे लवकरच सादर करणार प्रस्ताव. ४जिल्हा परिषदेने तयार केला प्रस्ताव. ४शासनाचे विकासाचे धोरण थेट स्मशानभूमीपर्यंत. ४जनसुविधाअंतर्गत उभारणार स्मशानशेड. शासनाचे विकासाचे धोरण माणसाच्या अंतिम यात्रेपर्यंत म्हणजेच स्मशानभूमीपर्यंत जाऊन पोहोचले आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून जनसुविधाअंतर्गत स्मशान शेड उभारण्यात येणार आहेत.
स्मशानशेड उभारणार
By admin | Updated: August 1, 2016 00:29 IST