शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटी,फोल्डींग सायकल विज्ञान प्रदर्शनातील आकर्षण

By admin | Updated: January 19, 2015 00:24 IST

अखंड भारत स्वच्छता व गांधी जयंतीच्या ‘खेड्याकडे चला’ या संदेशाची प्रचिती आल्यावाचून राहत नाही.स्मार्ट सिटी किंवा गाव कसे असावे, तसेच कचरा निर्मूलन किंवा व्यवस्थापन यावर सर्वाधिक भर देण्यात आला होता

रत्नागिरी : ‘चिरंतन विश्वासाठी गणित आणि विज्ञान’ थिम घेऊन, आयोजित करण्यात आलेल्या ४० व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे लक्ष्य स्मार्ट सिटी कचरा व्यवस्थापन, फोल्डींग सायकल आकर्षण ठरत आहे. मुख्य द्वारावर उभा असलेला रोबोट सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. पाहुण्यांना नमस्कार किंवा हस्तांदोलन हे त्याचे खास आकर्षण होते. याशिवाय, फोल्डींग सायकल हा तर कुतूहलाचा विषय होता. महाविद्यालयाच्या तीन मजली इमारतीतील प्रत्येक खोलीतून ४३६ विविध प्रकल्प सादर करण्यात आले. दुषीत हवा शुद्धीकरण उपक्रम या प्रयोगातून गावातील, शहरातील, कारखान्यातील दुषीत हवेचे शुद्धीकरण कसे करता येईल, याचे विश्लेषण करण्यात आले होते. बोअरवेलमध्ये अडकलेले मुल फुग्याचा वापर करुन, कसे बाहेर काढता येईल यासाठी बालवैज्ञानिकांनी कल्पकतेने उपकरण मांडले होते. रेल्वेस्टेशनवरील अस्वच्छता दूर करण्यासाठी रेल्वेमध्ये स्टेशन येण्यापूर्वीच, सायरनचा वापर करुन स्टेशनमधून गाडी सुटेपर्यंत प्रसाधन गृहांचा वापर करता येणार नाही. जेणेकरुन प्रवाशांना याची जाणीव होईल व पर्यायाने स्थानक स्वच्छ राहिल.गृहिणींना घरच्या घरी व्यायाम करत असतानाच, घरातील अन्य कामेही कशी सुलभ होतील हे सांगण्यासाठी एक्सल बाईक कम वॉशिंग मशीन हे उपकरण मांडण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या उपक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या अखंड भारत स्वच्छता व गांधी जयंतीच्या ‘खेड्याकडे चला’ या संदेशाची प्रचिती आल्यावाचून राहत नाही.स्मार्ट सिटी किंवा गाव कसे असावे, तसेच कचरा निर्मूलन किंवा व्यवस्थापन यावर सर्वाधिक भर देण्यात आला होता. जेणेकरुन स्वच्छता राखण्यास हातभार लागेल. लोकसंख्या शिक्षणांतर्गत शिक्षकांनीही विविध प्रयोग मांडले होते. त्यामध्ये एडस् जनजागृती, शिक्षण करी देशाचे रक्षण, व्यसनाचे दुष्परिणाम, स्वच्छता व आरोग्य, अंधश्रद्धा निर्मूलन, मुलगी वाचवा हो आदी प्रयोग मांडून, त्यामधून सर्व जनतेस सामाजिक संदेश देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)घनकचरा निर्मूलन करीत असतानाच, कचऱ्याचे विघटन करुन बायोगॅस, विद्युत निर्मिती तसेच गटारे व उद्योगाच्या सांडपाण्यांचे शुद्धीकरण तसेच, पुर्नवापर काच व कागद निर्मुलन त्याचा पुर्नवापर कसा करता येईल, हे प्रयोगातून मांडून संसर्गजन्य रोगाच्या प्रसारावर कसा प्रतिबंध होईल, हे मांडण्यात आले होते. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी मजूर तसेच जनावरांचा वापर न करता, आधुनिक शेतीयंत्र वापरले तर, कमी वेळेत व कमी खर्चात शेतीची कामे कशी सोपी होतील, हे आधुनिक शेती यंत्राद्वारे मांडण्यात आले होते. ज्या यंत्राद्वारे पेरणी, नांगरणी, खुरपणी, खते टाकणे तसेच फवारणीची कामे एकाच यंत्राने शक्य आहे.विद्यार्थ्यांना साध्या सोप्या भाषेत व खेळातून विज्ञान विषयाची आवड, गोडी निर्माण होण्यासाठी उपयुक्त असे, शैक्षणिक साहित्य वापरून ‘जीवनसत्वाची सापशिडी’ मांडण्यात आली होती. या खेळातून जीवनसत्वांचा स्रोत व त्याअभावी होणारे दुष्परिणाम, यांची माहिती समजण्यासाठी सोप्या तंत्राचा अवलंब करण्यात आला आहे. वाहनांचे गगनाला भिडलेले दर, तसेच इंधनांचे वाढते दर यावर उपाय म्हणून, पवन उर्जेवर चालणारी वाहने, सोलर, स्ट्रीट लाईट उपकरण मांडण्यात आले. नैसर्गिक आपत्ती, महापूर येण्यापूर्वी, त्याबाबतचे सुचक यंत्र तसेच एटीएम मशिनमध्येही होणारा चोरीचा प्रयत्न रोखण्यासाठी मोबाईलचा वापर कल्पकतेने करुन, त्याची कल्पना शाखा व्यवस्थापकास होऊन त्यांच्याव्दारे पोलिसांच्या मदतीने चोरांना लागलीच पकडणे शक्य होणार आहे.