शहरं
Join us  
Trending Stories
1
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
2
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
3
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
4
भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
5
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
6
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
7
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
8
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
9
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
10
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
11
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
12
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
13
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
14
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
15
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
16
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 
17
"घाबरण्याची गरज नाही..," भारत-पाक तणावादरम्यान इंडियन ऑईलनं पेट्रोल-डिझेलवर केलं मोठं वक्तव्य
18
"पुढचं आईस्क्रीम आता लाहोरमध्येच खाईन"; कर्तव्यावर परतलेल्या जवानाचा व्हिडीओ पाहून वाटेल अभिमान!
19
India Pakistan: पाकिस्तानच्या मिसाईल्स फटाक्यासारख्या फुस्स; पंजाबमध्ये सापडली पाडलेली क्षेपणास्त्रे, बघा व्हिडीओ
20
सलमान खान आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत, गलवान व्हॅलीतील भारत-चीन युद्धावर येणार सिनेमा

आरक्षित जागांसाठी पक्षांच्या दाही दिशा

By admin | Updated: April 3, 2015 00:46 IST

राजकारण तापले : निवडणुक, पोटनिवडणुकीतून शक्ती दाखवणार

राजापूर : तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक तर ११ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली असून, सर्वच पक्षीय आपापले उमेदवारी अर्ज सादर करण्यात गुंतले आहेत. ७ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असून आरक्षित प्रभागातील उमेदवारांसहित महिलांची शोध मोहीम जोरात सुरु आहे. तर काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध पार पाडण्याच्यादृष्टीने तयारी सुरु आहे.तालुक्यात एकूण १०१ ग्रामपंचायती असून, त्यापैकी ५० टक्के म्हणजे ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका या महिन्यात पार पडत आहेत. त्यामध्ये शिवणे खुर्द, गोवळ, धोेश्वर, शीळ, ओणी, कोंडीवळे, कोदवली, देवाचे गोठणे, चिखलगाव, चुनाकोळवण, मंदरुळ, हातदे, करक, पांगरी खुर्द, हरळ, कारवली, येरडाव, मिळंद, जवळेथर, काजिर्डा, कोळंब, फुफेरे, ओशिवळे, सौंदळ, कशेळी, सोलगाव, आंबोळगड, वाडापेठ, कोंडसर बु., उन्हाळे, मोरोशी, पन्हळेतर्फे सौंदळ, वालये, पांगरे बु., दोनिवडे, ससाळे, महाळुंगे, तळगाव, मोसम, अणसुरे, निवेली, दळे, कुवेशी, कुंभवडे, तारळ, पडवे यांचा समावेश आहे तर देवाचे गोठणे, कोतापूर, वडवली, खरवते, वडदहसोळ, पडवे, कोळवणखडी, आंगले, साखरीनाटे, मोगरे व कोंड्येतर्फे सौंदळ अशा ११ ग्रामपंचायती अंतर्गत पोटनिवडणुका पार पडत आहेत. त्यामुळे तालुक्यात ६२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून ७ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत, तर २२ एप्रिलला मतदान पार पडेल. यामुळे तालुक्यातील विविध राजकीय पक्षांची लगबग सुरु आहे. राजापुरात प्रामुख्याने शिवसेना व काँग्रेस या दोन पक्षांकडे जास्त ग्रामपंचायती आहेत. त्या खालोखाल राष्ट्रवादीकडे ग्रामपंचायती आहेत. केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपचे मात्र तालुक्यात खाते शून्य आहे. मनसेसह आरपीआयचीदेखील परिस्थिती अशीच आहे.प्रत्येक ग्रामपंचायत अंतर्गत आरणिातील स्त्री, पुरुष उमेदवारांचे जात प्रमाणपत्रासाठी आता धावपळ सुरु आहे. गतवेळी काही ठिकाणी आरक्षणांतर्गत जातीचे प्रमाणपत्र नसल्याने काही ठिकाणच्या जागा रिक्त राहिल्या होत्या. तशी वेळ यावेळी येऊ नये म्हणून अनेक राजकीय पक्षांनी ती खबरदारी घेतली आहे. स्थानिक पातळीवरील विकास प्रचारादरम्यानचा महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे.गावांतर्गत असलेली शांतता सुव्यवस्था अबाधित राहवी यासाठी बिनविरोध पार पडाव्यात यासाठी गावोगावच्या तंटामुक्त समित्या सरसावल्या असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरु झाले आहेत. जिल्हापरिषदेसह पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वातावरण निवडणुकमय बनू लागले आहे. (प्रतिनिधी)