शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

गांभीर्य दाखवा, अन्यथा अनर्थ ओढवेल - कदम

By admin | Updated: July 4, 2015 00:13 IST

महावितरणला झटका : दापोलीच्या आमदारांनी घेतले फैलावर

दापोली : तालुक्यातील अनेक गावे अंधारात आहेत. काही गावांची १५ ते २० दिवस लाईट नाही. त्यातच जनतेला रॉकेल मिळत नाही. दुसरीकडे वारंवार वीज गायब होतेय. जनतेने जगायचे कसे, असा संतप्त सवाल करत दापोली महावितरण कंपनीला लोकांना वीज देता येत नसेल तर कार्यालयाला टाळे लावण्यात येईल, असे खडे बोल त्यांनी सुनावले. यापुढे जनतेच्या समस्यांकडे गांभीर्याने पहा. जनतेच्या भावनांचा उद्रेक झाल्यास अनर्थ होइल, असा इशारा दापोलीचे आमदार संजय कदम यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना झालेल्या बैठकीत दिला.दापोली शहरात गेले चार दिवस वीज नसल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक उद्योगधंद्यावर परिणाम झाला. दापोली तालुक्यातील दाभोळ सबसेंटर, कुडावळे, हर्णै, केळशी या भागातील अनेक गावात १० ते १५ दिवस लाईट नाही. ग्रामीण भागातील जनता अंधारात आहे. अनेक ठिकाणचे वीजखांब वाऱ्यामुळे उन्मळून पडले आहेत.याबाबत महावितरण कंपनीकडे वारंवार पाठपुरावा केला जातो. मात्र अधिकारी, कर्मचारी त्याबाबत गंभीर नाहीत. गंजलेले धोकादायक पोल बदलणे, ज्या ठिकाणी नवीन पोल उभे करायचे आहेत ते करुन घेणे, पावसाळ्यात कर्मचाऱ्याने सतर्क राहणे आदी सूचना आमदार संजय कदम यांनी दिल्या.मुरुड, लाडघर, कर्दे ही पर्यटनस्थळे आहेत. येथील हॉटेल व्यावसायिक लाखो रुपयांची बिले भरत आहेत. तरीही मागणीच्या प्रमाणात वीजपुरवठा होत नाही. कमी क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर असल्याने हॉटेलमध्ये विजेचा योग्य सप्लाय होत नाही. हॉटेल्समधील एसी चालत नाहीत. फॅनचा स्पीड कमी होतो. त्यामुळे नवीन जास्त होल्टेजचे ट्रॉन्सफार्मर बसवून मिळावेत, अशी मागणी हॉटेल व्यावसायिक शैलेश मोरे, मंगेश मोरे यांनी केली.दापोलीचे आमदार संजय कदम यांनी तालुक्यातील सर्व गावांचा विजेचा आढावा घेतला. या बैठकीत अनेक समस्यांवर तोडगा काढण्यात आला. जालगाव - बौद्धवाडी येथील दारिद्र्यरेषेखालील वस्तीचे काम गेली दोन वर्षे स्थगित आहे. यावर तोडगा काढण्यात आला. ज्या गावात लाईटबाबत तक्रारी आहेत, यावर तोडगा काढण्याचे आश्वासन अधिकाऱ्याने दिले. या बैठकीला महावितरणचे सर्व अधिकारी उपस्थित होते. पाठपुरावा करण्यावर त्यांनी तडजोड सहन करणार नाही असे सांगितले. (प्रतिनिधी)तालुक्यातील वाढता पर्यटन व्यवसाय लक्षात घेता यापुढे केवळ हॉटेल व्यवसायासाठी वेगळ्या सबस्टेशनचा प्रस्ताव पाठवू. त्यासाठी लागणारी सरकारी जागा उपलब्ध झाल्यास केंद्र सरकारच्या दिनदयाळ योजनेतून सब सेंटर उभारण्यात येईल. भविष्यात हॉटेल व्यावसायिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेऊ.- एस. एस. माने, महावितरण अधिकारी, दापोली