शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा देणारी दुकानेही आजपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:31 IST

रत्नागिरी : ‘ब्रेक द चेन’अंतर्गत रत्नागिरीत अत्यावश्यक सेवेवरही जिल्हा प्रशासनाने निर्बंध आणले असून त्याची अंमलबजावणी शुक्रवारपासून सुरू करण्यात आली ...

रत्नागिरी : ‘ब्रेक द चेन’अंतर्गत रत्नागिरीत अत्यावश्यक सेवेवरही जिल्हा प्रशासनाने निर्बंध आणले असून त्याची अंमलबजावणी शुक्रवारपासून सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व किराणा दुकाने तसेच भाजी विक्रेते यांना सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत घरपोच सेवा देण्याची मुभा दिली आहे. दुकाने उघडलेली दिसल्यास त्यावर तात्काळ कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. तसेच औषध दुकानांमधील कर्मचाऱ्यांचीही कोरोना चाचणी करण्यास सुरुवात झाली आहे.

शासनाने १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून लाॅकडाऊन केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळून अन्य दुकानांना सुरू करण्यास मनाई करण्यात आली आहे. यानुसार, शुक्रवारी अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश असलेले किराणा दुकानदार, भाजीविक्रेते, औषध दुकाने यांच्यासह बेकरी आदी दुकाने सुरू ठेवण्यात आली होती. मात्र, जिल्हा प्रशासनाने लाॅकडाऊन अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला असल्याने ही दुकानेही तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच केंद्र सरकारच्या कोरोनाविषयक निर्देशानुसार घरपोच सेवेशी संबंधित कामगार वर्गाचे लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करण्याचेही आदेश दिले आहेत.

शुक्रवारी ही सर्व दुकाने सुरू होती. या दुकानदारांना एका दिवसात माल संपविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर घरपोच सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कोरोना टेस्ट करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

मात्र, औषधांची दुकाने वगळता अन्य दुकानांना बंदी घालण्यात आल्याने व्यापाऱ्यांमधून पुन्हा तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवा सर्वच दुकानदारांना घरपाेच देता येणे शक्य नाही. त्यामुळे ही दुकाने बंद राहिली तर या दुकानदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. त्यामुळे किमान किराणा, दूध, भाजीपाला आदी अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यास प्रशासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

सध्या प्रशासनाकडून अचानक अत्यावश्यक दुकानेही बंद करण्याचे आदेश आल्याने या दुकानदारांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान शनिवारपासून सर्वच दुकाने बंद राहणार असल्याने घरात बसलेल्या नागरिकांच्या जिवाला ‘उद्यापासून काय’ हा घोर लागून राहिला आहे.

चौकट

- अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने यांना सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत केवळ घरपाेच सेवा देता येणार आहे.

- आवश्यक सेवा पुरविणारे दुकान मालक, त्यामध्ये काम करणारा कामगार वर्ग यांचे लवकारत लवकर लसीकरण करावे. ग्राहकांशी संवाद साधताना पारदर्शक काचेमधून संपर्क अथवा इतर सुरक्षा उपाय, ऑनलाइन पेंमेंट इत्यादीचे पालन करावे.

चौकट

- नियमांचा भंग करणाऱ्या दुकानमालक, कर्मचारी किंवा ग्राहकाला पाचशे रुपये दंड केला जाईल. तसेच कोविड सुसंगत वागणुकीचा भंग करणाऱ्या ग्राहकाला माल दिला जात असेल तर दुकानाला एक हजार रुपये दंड केला जाईल. तसेच शर्तभंगाची पुनरावृत्ती झाल्यास कोरोना साथ संपेपर्यंत दुकान बंद करण्याची कार्यवाही केली जाईल.

- रस्त्याच्या कडेला खाद्यपदार्थ विक्रेत्यांना जागेवर खाद्यपदार्थ खाण्यास पुरविता येणार नाहीत. फक्त पार्सल सेवा व घरपोच सेवा सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सर्व दिवशी सुरू ठेवता येतील.

-